शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई निधी नियमांच्या कात्रीत

By admin | Updated: November 21, 2014 00:07 IST

टॅँकरला जीपीएसचा अडसर : देयके देण्यास नकार

  नाशिक : टंचाई कृती कार्यक्रमांतर्गत उन्हाळ्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांवर झालेल्या खर्चापैकी टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर झालेल्या खर्चासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिलेला असला, तरी जीपीएस कार्यप्रणालीवर नोंद झालेल्या व गावोगावी पाणी पुरवणाऱ्या टॅँकरचीच देयके अदा करण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्याने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या ठेकेदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. उन्हाळ्यात टॅँकरद्वारे करण्यात येणारा पाणीपुरवठा नेहमीच वादात सापडत असल्याची आजवरची उदाहरणे आहेत. मंजूर टॅँकरपेक्षाही कमी टॅँकरने पाणीपुरवठा करून बिले काढणे, टॅँकरने पाणीपुरवठाच न करणे, पाण्याचा स्रोत व प्रत्यक्ष पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या ठिकाणाचे अंतर वाढवून दाखविणे, फेऱ्या वाढविणे या साऱ्या गैरप्रकारांमुळे टंचाई कृती कार्यक्रमात भ्रष्टाचार होत असल्याचे आढळून येऊन चौकशी व ठेकेदाराकडून फेरवसुली करण्याचेही प्रकार घडले आहेत. त्यामुळे यंदा शासनाने टॅँकर इच्छितस्थळी पाणीपुरवठा करते किंवा नाही हे पाहण्यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या टॅँकरला जीपीएस (ग्लोबल पोझिशन सिस्टीम) प्रणाली कार्यान्वित करण्याच्या सूचना केल्या होत्या; मात्र त्याची किती ठेकेदारांनी पूर्तता केली हे समजू शकले नसले, तरी मिळालेल्या माहितीनुसार ठेकेदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले व ज्यांच्यावर त्याची जबाबदारी टाकण्यात आली होती, त्या यंत्रणेनेही फारसे गांभीर्याने घेतले नाही. परिणामी आता मात्र टॅँकरची देयके अदा करताना शासनाने हीच अट घातली आहे.