शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ स्मशानभूमीचा ‘स्पॉट पंचनामा’

By admin | Updated: November 12, 2014 23:57 IST

‘त्या’ स्मशानभूमीचा ‘स्पॉट पंचनामा’

सिन्नर : मूलभूत जनसुविधा योजनेतून कागदोपत्री अनेक कामे पूर्ण झाल्याचे दाखवून तीन लाख रुपयांचा निधी काढण्यात आलेल्या वावी येथील ‘त्या’ स्मशानभूमीला प्रभारी गटविकास अधिकारी व बांधकाम विभागाचे उपअभियंता यांनी समक्ष भेट देऊन सद्यस्थितीचा पंचनामा केला. वावी येथील दलित बांधवांसाठी बांधण्यात येणाऱ्या स्मशानभूमीचे सुमारे ७५ टक्के बांधकाम पूर्ण झाल्याचे दाखवून गेल्या आठ महिन्यापूर्वीच कणकेश्वर मजूर संस्थेने ३ लाख १३ हजार रुपयांचा निधी काढल्याचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पंचायत समितीचे गटनेते उदय सांगळे यांनी पुराव्यानिशी उघड केले होते. याबाबतची सांगळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सदर प्रकरणात अधिकाऱ्यांसह त्यांना पाठीशी घालणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. याबाबतची गटविकास अधिकाऱ्यांकडे त्यांनी लेखी तक्रार केली होती. स्मशानभूमीचे काम न करता निधी काढल्याच्या प्रकाराची प्रभारी गटविकास अधिकारी मधुकर वाघ यांनी गंभीर दखल घेतली. बांधकाम विभागाचे उपअभियंता शेखर मराठे व तक्रारदार उदय सांगळे यांच्यासह वाघ यांनी वावी गाठून झालेल्या व सुरू असलेल्या कामाचा पंचनामा केला. घटनास्थळी ताजे बांधकाम सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबतचा वस्तुस्थितिदर्शक पंचनामा वाघ व मराठे यांनी केला आहे. (वार्ताहर)