नाशिक शहरात कोरोनाचा चौथा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 10:01 PM2020-05-23T22:01:31+5:302020-05-24T00:21:47+5:30

नाशिक : शहरात बाहेरून येणाऱ्यांमुळे कोरोनाचा धोका वाढला असताना शहरातून बाहेर जाऊन पुन्हा शहरात येणाऱ्यांमुळेदेखील धोका वाढला आहे. सातपूर-अंबड लिंकरोडवरील एक ज्येष्ठ नागरिक नवी मुंबईला सहकुटुंब जाऊन आल्याने त्याचा स्वत:चा मृत्यू झाला. त्याचबरोबर समतानगर येथील एका इसमाचीही शनिवारी मृत्यूची घटना घडल्याने शहरात कोरोनाने आजवर चार बळी घेतले आहेत. दरम्यान, सायंकाळपर्यंत आलेल्या अहवालानुसार शहर परिसरात कोरोनाबाधितांची संख्या ७४ इतकी झाली आहे.

 Corona's fourth victim in Nashik city | नाशिक शहरात कोरोनाचा चौथा बळी

नाशिक शहरात कोरोनाचा चौथा बळी

Next

नाशिक : शहरात बाहेरून येणाऱ्यांमुळे कोरोनाचा धोका वाढला असताना शहरातून बाहेर जाऊन पुन्हा शहरात येणाऱ्यांमुळेदेखील धोका वाढला आहे. सातपूर-अंबड लिंकरोडवरील एक ज्येष्ठ नागरिक नवी मुंबईला सहकुटुंब जाऊन आल्याने त्याचा स्वत:चा मृत्यू झाला. त्याचबरोबर समतानगर येथील एका इसमाचीही शनिवारी मृत्यूची घटना घडल्याने शहरात कोरोनाने आजवर चार बळी घेतले आहेत. दरम्यान, सायंकाळपर्यंत आलेल्या अहवालानुसार शहर परिसरात कोरोनाबाधितांची संख्या ७४ इतकी झाली आहे.
दरम्यान, शहरात शनिवारी (दि.२३) आणखी सात रुग्ण आढळले त्यात एक कॉलेजरोड आणि एक महाराणाप्रताप चौकातील तर नाईकवाडीपुरा येथील चार व एक रुग्ण शिवाजीवाडी येथील आहे. त्यामुळे बाधितांची संख्या ७४ झाली आहे.
मुंबई-पुणे आणि मालेगावबरोबरच धुळे आणि जळगावमधून नाशिक शहरात येणाºयांमुळे बाधितांची संख्या वाढत असल्याचा महापालिकेचा आक्षेप आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांना पत्र देऊन सीमा सील करण्याच्या सूचना महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे दिल्या होत्या. परंतु आता त्याच्या पुढे जाऊन नाशिक शहरातील अनेक जण बाहेरगावी जाऊन आल्याने संसर्गचा धोका वाढत असल्याचेदेखील प्रकार घडत आहे.
काही दिवसांपूर्वी सातपूर येथील महिला आणि तिचे कुटुंबीय मालेगाव येथे अंत्यसंस्कारासाठी गेले होते. त्यानंतर त्या वृद्धेला आणि तिच्या संपर्कातील तब्बल दहा जणांना कोरोनाची लागण झाली होती. सुदैवाने उपचाराअंति हे सर्व बरे झाले. परंतु आता मात्र, संजीवनगर येथे असाच प्रकार घडला आहे. येथील एक कुटुंब नवी मुंबई येथे नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी गेले होते. तेथून परल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाला १९ मे रोजी त्रास होऊ लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यावेळी त्याचा घसा स्त्रोत नमुना तपासल्यानंतर तो पॉझिटिव्ह आला. परंतु त्या वृद्धाचा त्याच दिवशी मृत्यू झाला तर समतानगर येथील ५४ वर्षीय पुरुष हा आंबोली येथे आरोग्यसेवक म्हणून काम करीत होता. त्यालाही त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान त्याचे शनिवारी निधन झाले. या वृद्धाच्या संपर्कातील दोन जणांनादेखील लागण झाल्याचा पहिला अहवाल आला. त्यानंतर महापालिकेने त्या वृद्धाच्या संपर्कातील ५३ जणांचे नमुने पाठविले होते. शुक्रवारी (दि.२२) त्यातील ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील एक महिला लेखानगर येथील आहे, तर एकजण पंचवटीतील असल्याचे आढळले. आणखी काही अहवालांची प्रतीक्षा असून, त्यामुळे महापालिका चिंतित आहे.
दरम्यान, शनिवारी (दि.२३) आणखी दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील एक जण कॉलेजरोडवर राहण्यास असला तरी मालेगाव येथे कर्तव्य बजावणारा पोलीस अधिकारी आहे तर एक जण राणा प्रताप चौकातील बाधित रुग्ण नवा आहे. त्यानेदेखील बाहेरगावी प्रवास केल्याची हिस्ट्री आहे.

Web Title:  Corona's fourth victim in Nashik city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक