शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

कोरोनाबाधित ५७४९; बळी ४०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 4:13 AM

नाशिक : काेरोना बळींनी रविवारी (दि. १८) पुन्हा ४० आकडा गाठल्याने आतापर्यंतच्या बळींची एकूण संख्या २९३५ वर पोहोचली ...

नाशिक : काेरोना बळींनी रविवारी (दि. १८) पुन्हा ४० आकडा गाठल्याने आतापर्यंतच्या बळींची एकूण संख्या २९३५ वर पोहोचली आहे. तसेच जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने पुन्हा पाच हजारांचा आकडा ओलांडून एकूण ५७४९ पर्यंत मजल मारली आहे.

जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये ३३६५ तर नाशिक ग्रामीणला २२४९ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ५० व जिल्हाबाह्य ८५ रुग्ण बाधित आहेत. तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात १७, ग्रामीणला २१, तर मालेगाव मनपा क्षेत्रात २ अशा एकूण ४० जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा हतबल ठरली आहे. गत पंधरवड्यापासून मृतांची संख्या सातत्याने तीसहून अधिक राहिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात यापेक्षाही कठोर उपाययोजनांच्या अंमलबजावणीची आवश्यकता असल्याचा सूर नागरिकांकडूनच व्यक्त होऊ लागला आहे.

इन्फो

उपचारार्थी रुग्णसंख्या ३८ हजारांवर

जिल्ह्यात ज्या वेगाने कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडली आहे, त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या ३८ हजार ४६७ वर पोहोचली आहे. त्यात २१ हजार ४२४ रुग्ण नाशिक मनपा क्षेत्रातील, १४ हजार ९५१ रुग्ण नाशिक ग्रामीणमधील, १ हजार ९१८ मालेगाव मनपा क्षेत्रातील, तर जिल्हाबाह्य १७४ रुग्णांचा समावेश आहे.

इन्फो

प्रलंबित अहवाल सात हजारांवर

गत महिन्यापासून दररोज वाढत असलेल्या नमुन्यांमुळे कोरोना काळात सातत्याने प्रलंबित अहवालांची संख्या मोठीच राहत आहे. त्यात सर्वाधिक प्रलंबित अहवाल नाशिक ग्रामीणचे ३५२० असून नाशिक मनपा क्षेत्रातील २९३१, तर मालेगाव मनपाचे ७२९ अहवाल प्रलंबित आहेत. प्रलंबितची संख्या इतकी वाढलेली असल्याने नवीन आठवड्यात बाधितांच्या प्रमाणात प्रचंड वाढीचे अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे.