उत्तर महाराष्ट्रात कोरोना मुक्तीचे प्रमाण 90 टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 01:22 IST2020-10-11T23:35:29+5:302020-10-12T01:22:52+5:30

नाशिक- उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्'ात गेल्या आठवडाभरात कोरोना बधितांची संख्या वाढली असली तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाण आता 90 टक्के झाले आहे. गेल्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्रात कोरोबाधितांची संख्या दोन लाखांचा टप्पा ओलांडून पुढे गेली असली तरी एकूण दोन लाख ५ हजार ९५ रुग्णांपैकी एक लाख ८४ हजार ६९५ रुग्ण उपचाराअंती बरे झाल्याने कोरोना मुक्त होण्याचे हे प्रमाण ९०.०४ टक्के झाले आहे. विभागात आतापर्यत ३९९९ बधितांचा मृत्यू झाला असून सरासरी मृत्यूदर १.९४ टक्के आहे. गत आठवड्याच्या तुलनेत त्यात घट झाली आहे. गेल्या आठवड्यात १.९९ टक्के इतका मृत्यू दर होता.

Corona liberation rate in North Maharashtra is 90 percent | उत्तर महाराष्ट्रात कोरोना मुक्तीचे प्रमाण 90 टक्के

उत्तर महाराष्ट्रात कोरोना मुक्तीचे प्रमाण 90 टक्के

ठळक मुद्देमृत्यू दर घसरला: बाधित आढळण्याचे प्रमाण 31 टक्के

नाशिक- उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्'ात गेल्या आठवडाभरात कोरोना बधितांची संख्या वाढली असली तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाण आता 90 टक्के झाले आहे. गेल्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्रात कोरोबाधितांची संख्या दोन लाखांचा टप्पा ओलांडून पुढे गेली असली तरी एकूण दोन लाख ५ हजार ९५ रुग्णांपैकी एक लाख ८४ हजार ६९५ रुग्ण उपचाराअंती बरे झाल्याने कोरोना मुक्त होण्याचे हे प्रमाण ९०.०४ टक्के झाले आहे. विभागात आतापर्यत ३९९९ बधितांचा मृत्यू झाला असून सरासरी मृत्यूदर १.९४ टक्के आहे. गत आठवड्याच्या तुलनेत त्यात घट झाली आहे. गेल्या आठवड्यात १.९९ टक्के इतका मृत्यू दर होता.
उत्तर महाराष्टात सर्वाधिक ८५ हजार ८२ रुग्ण नाशिक जिल्'ाात आढळले असले तरी यातील ७५ हजार ११३ रुग्ण करोनामुक्त झाले. आता पर्यंत १ हजार ५१३ जणांचा मृत्यू झाला. सध्या संपूर्ण जिल्'ात ८ हजार ४५६ रुग्ण उपचार घेत आहेत. जळगाव जिल्'ाात आतापर्यंत ५१ हजार रुग्ण आढळले असून त्यातील ४६ हजार ७१५ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. १२२१ जणांचा मृत्यू झाला. सध्या सुमारे तीन हजार रुग्ण उपचार घेत आहेत. अहमद नगर जिल्'ाात रुग्ण संख्या ५० हजारावर गेली असली तरी एकूण बधितांपैकी ४५ हजार ६३८ रुग्ण बरे झाले तर ७७० रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या संपूर्ण ३८१४ रुग्ण उपचार घेत आहेत. धुळे जिल्'ाात १३ हजार रुग्णांपैकी यापैकी ११ हजार ९६४ जण बरे झाले. तर ३६८ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या या जिल्'ात ५५२ रुग्ण उपचार घेत आहेत. नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्'ाात करोनाबाधितांची संख्या सहा हजाराच्या जवळ असून यातील पाच हजार २६५ रुग्ण बरे झाले. १२७ जणांचा मृत्यू झाला. सध्या ५८७ रुग्ण उपचार घेत आहेत.

बाधितांचे प्रमाण घटले
गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात कोरोना बाधित आढळण्याचे प्रमाण घटले आहे ते ३१.८४ टक्क्यांवर आले आहे उत्तर महाराष्ट्रात मार्च महिन्यापासून आता पर्यंत सहा लाख ४४ हजार ३७ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या त्यात ३१.८४ टक्के संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर चार लाख ३५ हजार ३९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत .१ हजार २०९ अहवाल अनिर्णित असून २ हजार २१२ अहवाल प्राप्त झालेले नाहीत.

Web Title: Corona liberation rate in North Maharashtra is 90 percent