शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेत वाटा, तरीही विकासाला फाटा

By admin | Updated: January 20, 2017 01:07 IST

दुर्लक्षित नाशिकरोड : प्रकल्पांची लागली वाट; लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासनाला वावडे

 मनोज मालपाणी, नाशिकरोड :गत २५ वर्षांच्या महानगरपालिका लोकप्रतिनिधींच्या कार्यकाळात नाशिकरोड विभागाकडे एकदा सर्वोच्च महापौरपद, तीन वेळा स्थायी समिती सभापती व दोन वेळा महापौरपद मिळाले. मात्र तरीदेखील महत्त्वाचे प्रकल्प, कामे व गावठाण-झोपडपट्टीतील विकासाची कामे रेंगाळलेली आहेत.नगरसेवकांच्या २५ वर्षांच्या कार्यकाळात विविध पक्षांची सत्ता मनपामध्ये आली. तर नाशिकरोड विभागावरदेखील कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांचे वर्चस्व २५ वर्षांत राहिलेले आहे. चौथ्या पंचवार्षिकमध्ये २०१० ते २०१२ या अडीच वर्षांच्या काळात शिवसेनेच्या नयना वालझाडे (घोलप) यांनी महापौरपद भूषविले. महापौरपदाच्या काळात वालझाडे यांनी बिटको रुग्णालयाच्या नूतन इमारतीच्या कामाला मंजुरी देऊन निधीदेखील दिला. त्यामुळे रुग्णालयाच्या नूतन इमारतीचे काम लागलीच सुरू झाले. मात्र ते अद्यापही सुरूच आहे. तसेच नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालय इमारत त्यांच्याच काळात उभी राहिली. वडनेर येथील वालदेवी नदीवरील नवीन पूल, चेहेडी जलशुद्धीकरण केंद्र, रस्ते, भूमिगत गटारी, शाळा इमारत आदि विकासकामे झाली. दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये आगर टाकळी भागातून नगरसेवक म्हणून निवडून आलेले अशोक दिवे ९८-९९ या वर्षासाठी महापौर झाले होते. दिवे यांचा वॉर्ड पूर्व नाशिक विभागात असला तरी त्यांची जवळीक नाशिकरोड विभागाशी सर्वाधिक होती. त्यांच्या काळात सर्वांत मोठ्या प्रमाणात रस्त्यावरील अतिक्रमणाविरुद्ध मोहीम राबवून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. दिवेंच्या काळात इतर छोटी-मोठी कामे झाली असली तरी अतिक्रमण काढण्याव्यतिरिक्त दुसरे मोठे काम झाले नाही.तर पहिल्या पंचवार्षिकमध्ये कॉँग्रेसचे रामदास सदाफुले, रंजना बोराडे या उपमहापौर झाल्या होत्या. सदाफुले व बोराडे यांच्या काळात काही प्रमाणात विकासाची कामे झालीत. पण ‘शोभे’सारखे असणाऱ्या उपमहापौर हे पद नाशिकरोडला नावापुरते मिळाले. पहिल्या पंचवार्षिकमध्ये कॉँग्रेसचे निवृत्ती अरिंगळे यांनी स्थायी समिती सभापतिपद भूषविले. अरिंगळेंच्या काळात गंधर्वनगरी, लोकमान्यनगर, जिजामातानगर असा त्यांचा वॉर्ड असलेल्या भागांत रस्ते रुंदीकरण, पहिल्यांदाच पदपथ, उद्यान, खेळणी, पथदीप अशी कामे झालीत. अरिंगळे स्थायी सभापती असताना रंजना बोराडे उपमहापौर होत्या. तर चौथ्या पंचवार्षिकमध्ये २०११-१२ या काळात शिवसेनेचे रणजित नगरकर स्थायी सभापती झाले. विशेष म्हणजे याच काळात शिवसेनेच्या नयना वालझाडे महापौर होत्या. तर २०१३-१४ या काळात मनसेचे रमेश धोंगडे स्थायी सभापती झाले. एक वेळा महापौरपद, दोन वेळा उपमहापौर, तीन वेळा स्थायी समिती सभापतिपद मिळूनही त्या मानाने नाशिकरोड विभागात पाहिजे त्या प्रमाणात विकासकामे झाली नाही.