दूषित पाणी : अहवाल मागविला

By Admin | Updated: August 21, 2014 00:17 IST2014-08-20T23:33:25+5:302014-08-21T00:17:12+5:30

दूषित पाणी : अहवाल मागविला

Contaminated water: Report requested | दूषित पाणी : अहवाल मागविला

दूषित पाणी : अहवाल मागविला

वणी : परिसरात दूषित पाणीपुरवठा व परिसर अस्वच्छतेबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच आरोग्य विभागाने त्याची त्वरेने दखल घेत तालुका आरोग्याधिकारी डॉ. महेंद्र देवळीकर यांनी वणी ग्रामपंचायत व परिसराला भेट देऊन योग्य त्या सूचना देत अहवाल सादर करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले.
वणी व परिसरात दूषित पाणी व परिसर अस्वच्छतेमुळे बळावलेल्या साथीच्या आजाराची आकडेवारी लोकमतने प्रकाशित करताच खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाचे वणी येथील टेकाडी, इंदिरानगर जलशुद्धीकरण केंद्राचे एकूण चार नमुने आज तपासणीसाठी घेतले.
३१ जुलै रोजी नमुने घेतलेले पाणी दूषित असल्याचे पत्र १९ आॅगस्ट रोजी वणी ग्रामपालिकेला पांडाणे येथील आरोग्य विभागाने दिले. दरम्यान, दि. १९ जून २०१४, १७ जुलै २०१४, २१ जुलै २०१४, २९ एप्रिल २०१४ या दिवशी पांडाणे प्राथमिक आरोग्यकेंद्राने वणी ग्रामपालिकेला पत्र देऊन पाणीशुद्धीकरण व कीटकजन्यरोग प्रतिबंधक उपाययोजना, परिसर स्वच्छतेबाबत योग्य ती कार्यवाही करणेबाबत माहिती दिली होती. (वार्ताहर)

Web Title: Contaminated water: Report requested