शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस, राष्ट्रवादी बॅकफूटवर

By admin | Updated: February 24, 2017 23:52 IST

भाजपाची जोरदार मुसंडी : मतदारांनी बंडखोरांना नाकारले

महेश गुजराथी : चांदवडगेल्या २० वर्षांपासून चांदवड पंचायत समितीत कॉँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आता संपुष्टात आली. आज तरी चांदवड तालुक्यात स्पष्ट बहुमत कोणत्याही पक्षाला मिळाले नसले तरी अखेर भाजपा व शिवसेनेत विळ्या भोपळ्याचे झालेले नाते हे शेवटी सत्तास्थापनेसाठी एकत्र होतील यात शंकाच नाही. तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपा व शिवसेनेत यापूर्वीच युती न झाल्याने दोन्ही पक्षांनी वेगवेगळ्या निवडणुका लढविल्या आहेत तर चांदवड तालुक्यात कॉँग्रेस व राष्ट्रवादीत मात्र आघाडी झाल्याने त्यांनी दोन-दोन गट व चार-चार गण वाटुन घेतले. मात्र त्याचाही फारसा फायदा झाला नाही.चांदवड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या चार गटात भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना प्रत्येकी एक एक जागा तर आठ गणात भाजपा ३ , शिवसेना २, राष्ट्रवादी २, काँग्रेस १ असे संख्या बळ प्राप्त झाले त्यामुळे त्रिशंकू अवस्था असली तरी भाजपा - शिवसेना एकत्र आली तर सत्ता स्थापू शकतात मात्र हे येणारा काळच ठरवेन. तालुक्यात नव्हे तर सर्वत्र नोटबंदी, शेतमालाचे भाव, शेतमालाचे पैसे चेकने वेळेवर न मिळणे हे मुद्दे भाजपाला मतदान करणार नाही हे शेवटी निवडणूक निकालावरून फोल ठरले. त्यामुळे अनेक राजकीय विश्लेषकांचे अंदाज चुकले आहेत. आज तरी चांदवड तालुक्यात भाजपा व शिवसेनेला सत्ता स्थापू शकतील एवढे बहुमत आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर भाजपा व शिवसेनेत झालेले तोंडसुख आता पंचायत समिती सत्ता स्थापन करतांना किती टिकते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.  दुगाव गटात राष्ट्रवादी कॉँग्रेसची सत्ता बऱ्याच दिवसापासून असल्याने ती या गटाने व गणाने कायमस्वरुपी आपल्याच हाती ठेवली येथे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील रामकृष्ण शेलार, शिवसेनेचे प्रा. राजेंद्र सोमवंशी, रिपब्लीकनचे राजेंद्र लक्ष्मण गांगुर्डे असा चौरंगी सामनाझाला व राष्ट्रवादीचे डॉ. सयाजीराव गायकवाड मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. या गटात भाजपाचे सुनील शेलार कायमस्वरुपी रहिवासी असतांना त्यांना मतदारांनी टाळले तर नाशिक निवासी असणारे मात्र नेहमीच संपर्कात असल्याने त्यांना मतदारांनी तारले आहे. ते यापुर्वी याच गटातुन निवडून आले होते. तर दुगाव गणात कॉँग्रेसच्या निर्मला अहेर व मेसनखेडे गणात राष्ट्रवादीचे शिवाजी सोनवणे विजयी झाले. वडाळीभोई गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून आजही तो शिवसेनेने राखला येथे कष्टकरी व मजुरी करणाऱ्या शिवसेनेच्या कविता भाऊसाहेब धाकराव यांनी जोरदार राष्ट्रवादीच्या ज्योती बाळासाहेब धाकराव यांना पाठले तर वडाळीभोई गणात राष्ट्रवादीची सत्ता मोडीत काढीत शिवसेनेने आघाडी घेतली येथे शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन अहेर यांनी कादवाचे संचालक व सोसायटीचे सभापती सुखदेव जाधव यांचा पराभव केला जनसंपर्क , शिवसेनेतील कामाची पावती म्हणून त्यांचा विजय झाला आहे. सुखदेव जाधव हे सभापती अनिता जाधव यांचे पती आहे. मात्र येथेही जोरदार चुरस झाली व वडाळीभोई येथील राष्ट्रवादीची सत्ता गमवावी लागली.एक गठ्ठा मतांची विभागणीतालुक्यातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा तळेगावरोही गटात अखेर कॉँग्रेस व राष्ट्र्रवादीची युती झाली तरी येथे बंडखोरी झाली. येथून राष्ट्रवादीचे प्रा.मधुकर टोपे यांना तिकीट न मिळाल्याने बंडखोरी केली होती तर भाजपातूनही ज्यांना तिकिटाची खात्री होती ते डॉ. राजेंद्र दवंडे यांनी अखेर बंडखोरी केली. त्यामुळे गटातील गठ्ठा मते या बंडखोरांनी घेतलीच नाही मात्र येथे माजी आमदार शिरीष कोतवाल यांचे सुपुत्र राहुल शिरीषकुमार कोतवाल हे कॉँग्रेसकडून उभे होते तर त्यांच्या विरोधात डॉ. आत्माराम कुंभार्डे भाजपाकडून निवडणूक लढविली.