केंद्र सरकारच्या विरोधात सटाण्यात कॉंग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:40 IST2020-12-04T04:40:16+5:302020-12-04T04:40:16+5:30

येथील तहसील आवारात काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत ठिय्या दिला. त्यानंतर मध्यवर्ती प्रशाकीय इमारतीच्या भिंतीत शहराध्यक्ष कदम ...

Congress agitation in Satna against the central government | केंद्र सरकारच्या विरोधात सटाण्यात कॉंग्रेसचे आंदोलन

केंद्र सरकारच्या विरोधात सटाण्यात कॉंग्रेसचे आंदोलन

येथील तहसील आवारात काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत ठिय्या दिला. त्यानंतर मध्यवर्ती प्रशाकीय इमारतीच्या भिंतीत शहराध्यक्ष कदम यांनी केंद्र सरकार शेतकर्‍यांवर कृषी कायदा लादून दडपशाही करत असल्याच्या निषेधार्थ दडपशाहीचे प्रतीकात्मक आंदोलन छेडले. या अनोख्या आंदोलनाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. आंदोलनात जी. के. कापडणीस, अण्णासाहेब सोनवणे, विकास बोरसे, रवींद्र पवार, प्रवीण पवार, राजमल चौधरी, रोशन सोनवणे, सुरेश कंकरेज, दीपक पवार, मनोज ठोळे, एजाज शेख, यशवंत पवार, बाजीराव पाटील आदी सहभागी झाले होते.

फोटो कॅप्शन

०३ सटाणा आंदोलन

केंद्र सरकारच्या किसान विरोधी कायद्याचा विरोध भिंतीत कोंडून दडपशाहीचे प्रतीकात्मक आंदोलन छेडताना शहर अध्यक्ष किशोर कदम यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देताना कार्यकर्ते.

Web Title: Congress agitation in Satna against the central government