सेनेच्या गाडेकरांसह कार्यकर्त्यांना सशर्त जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2016 00:02 IST2016-04-01T23:25:32+5:302016-04-02T00:02:21+5:30

सेनेच्या गाडेकरांसह कार्यकर्त्यांना सशर्त जामीन

Conditional bail to the workers along with Sena's Gadkar | सेनेच्या गाडेकरांसह कार्यकर्त्यांना सशर्त जामीन

सेनेच्या गाडेकरांसह कार्यकर्त्यांना सशर्त जामीन

नाशिक : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया राहाटकर यांच्या उपस्थितीत श्रीकृष्ण मंगल कार्यालयात मंगळवारी (दि़२२ मार्च) सुरू असलेल्या भाजपा महिला सन्मान सोहळ्यात स्वतंत्र मराठवाड्याच्या प्रश्नावर घोषणाबाजी करीत गोंधळ घालून महिलांना मारहाण करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकारी सत्यभामा गाडेकरांसह नऊ जणांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ बी़ भोस यांनी शुक्रवारी (दि़१) सशर्त जामीन मंजूर केला़ यामुळे गत दहा दिवसांपासून मध्यवर्ती कारागृहातून सुटकेच्या प्रतीक्षेत असलेले शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे़
भारतीय जनता पक्षाच्या महिला सन्मान सोहळ्यात खुर्च्यांची मोडतोड व महिलांना मारहाण केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात सेनेच्या पदाधिकारी सत्यभामा गाडेकर, मंगला भास्करे, प्रशांत शिंदे, रोशन साळवे, राजू शेटे, योगेश शेवरे, योगेश गाडेकर, अर्जुन काळे, प्रशांत काळे, आशिष साबळे यांच्यासह सुमारे शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता़ यात अटक करण्यात आलेल्या संशयितांच्या जामिनाच्या कागदपत्रांसाठी वेळ लागल्याने या सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती़
न्यायालयास असलेल्या सलग सुट्या व जामीन सुरू असलेले कोर्ट रजेवर असल्याने या सर्व संशयितांच्या वकिलांनी शुक्र वारी (दि़१) न्यायाधीश भोस यांच्या न्यायालयात जामीन अर्ज सादर केला़ त्यामध्ये प्रत्येकी २० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलका व दर रविवारी १ ते ४ या वेळेत हजेरी या अटींवर संशयितांना जामीन मंजूर करण्यात आला़ तसेच या मारहाण प्रकरणात फरार असलेले युवा सेनेचे जिल्हाप्रमुख दीपक दातीर यांच्यासह इतर तिघा संशयितांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Conditional bail to the workers along with Sena's Gadkar