शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जलस्रोत कोरडे असल्याने चिंता कमी

By admin | Updated: September 30, 2014 22:16 IST

पाऊस : येवल्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांना परतीच्या पावसाची प्रतीक्षा

येवला : या तालुक्यातील पूर्वोत्तर भागातील १३ ते १५ खेड्यांचा परिसर अद्यापही जलस्रोत कोरडेच असल्याने आता परतीचा पाऊस तरी आमचे जलस्रोत भरेल अशी अपेक्षा धरून आहे.सध्या या भागातील पिके हलक्या पावसावर तग धरून आहेत. या परिसरात दोन मोठे पाऊस वगळता पावसाच्या रिमझिम सारीच चालू आहे. परंतु पालखेड लाभक्षेत्रातील शेतकरी मात्र ओव्हरफ्लोचे पाणी आल्याने आनंदित आहे. पालखेडच्या लाभक्षेत्रातील सारे शिवार अन् शेताच्या आसपास असलेले सारे खड्डे पाण्याने भरले आहे.राजापूर, खिर्डीसाठे, नगरसूल, लिहत, पिंपळखुटे तिसरे, जायदरे, आहेरवाडी, ममदापूर, कोळगाव, वाईबोथी, भारम, न्याहारखेडे, रेंडाळे या गावातील जलस्रोत अद्याप कोरडे आहेत. डोंगरगावचा धरणात जलसाठा अद्यापही केवळ ५ ते १० टक्के जलसाठा आहे. त्यामुळे या परिसरातील ८ ते १० गावांतील विहिरीच्या भविष्यातील पाणीस्रोत अधांतरी आहे. नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या पतीच्या कालावधीत सध्या तालुक्यात पोषक असे वातावरण तयार झाले आहे. राजस्थानपासून पावसाच्या परतीचा प्रवास सुरू झाला असून, पंजाब, हरयाणा, गुजरात, राज्यातून बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. राज्याच्या काही भागांत मान्सूनचा पाऊस अति समाधानकारक झाला असून, बहुतांशी ठिकाणी पाणीटंचाईचे संकट निवळले आहे.पण येवल्याच्या पूर्वोत्तर भागात मात्र पावसाची प्रतीक्षा आहे. (वार्ताहर)