शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २२ हजार हेक्टरवरील पंचनामे पूर्ण

By admin | Updated: March 23, 2015 23:34 IST

प्रतीक्षा मदतीची : सर्वाधिक नुकसान बागलाणमध्ये

 नाशिक : दोन आठवड्यांपूर्वी सलग चार दिवस जिल्ह्यांत हजेरी लावणारा अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या २२ हजारांहून अधिक हेक्टर पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून, त्यात कोट्यवधी रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पंचनामे पूर्ण झाल्याने आता शेतकऱ्यांना शासकीय मदतीची प्रतीक्षा आहे.दररोज पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे पंचनामे करणाऱ्या तलाठी, मंडळ अधिकारी व कृषी सहायकांना प्रचंड धावपळ करावी लागली. एकीकडे दररोज कोसळणारा पाऊस, तर दुसरीकडे शासनाचा पंचनामे तत्काळ करण्याच्या फतव्यामुळे यंत्रणेवर प्रचंड दबाव निर्माण झाला होता. एकाच शेतात दररोज कमी अधिक प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे वारंवार पंचनामे करण्याची, तर काही शेतामधील पूर्ण पीकच नष्ट झाल्याने पंचनामे तरी काय करणार, असा प्रश्न पडत होता. अशाही परिस्थितीत चार दिवस सलग पडलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. पंचनामे करताना ते थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन करण्यात यावेत, तसेच नुकसान झालेल्या पिकांचे छायाचित्र अथवा ध्वनिचित्रफीत काढण्यात यावी, त्याचबरोबर पंचनाम्यावर शेतमालकाची स्वाक्षरी घेण्याचेही बंधनकारक केल्याने पंचनामे करण्यासाठी यंत्रणेला दहा दिवसांचा कालावधी लागला.  त्यात जिल्ह्णातील बारा तालुक्यांतील ३८६ पैकी ३३७ गावांमधील ४५ हजार २०३ शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, त्यात २२ हजार ७४० हेक्टरवरील पिकांना अवकाळी पावसाने बाधा पोहोचली आहे. जिल्ह्णात सर्वाधिक पिकाचे नुकसान बागलाण तालुक्यात झाले असून, २२ गावांपैकी एकाच गावातील ३३७१ शेतकऱ्यांचे पंचनामे केले असता, २९०७ हेक्टरवरील पिके बाधित झाल्याचे स्पष्ट झाले. अन्य २१ गावांचे पंचनामे अद्याप शिल्लक असल्याने या तालुक्याचे नुकसान वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. सर्वात कमी नुकसान कळवण तालुक्यात झाले आहे. या तालुक्यातील २६ गावांना अवकाळी पावसाने फटका बसला; परंतु २१६ शेतकऱ्यांच्या फक्त ८२ हेक्टर पिकावरच त्याचा परिणाम झाला आहे.