मोतीवाला येथे सांप्रदायिक सद्भावना सप्ताह

By Admin | Updated: December 13, 2015 21:38 IST2015-12-13T21:38:04+5:302015-12-13T21:38:34+5:30

मोतीवाला येथे सांप्रदायिक सद्भावना सप्ताह

Communal Goodwill Week at Motivala | मोतीवाला येथे सांप्रदायिक सद्भावना सप्ताह

मोतीवाला येथे सांप्रदायिक सद्भावना सप्ताह

नाशिक : मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत राष्ट्रीय सांप्रदायिक सद्भाव सप्ताह साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत कला कौशल्यांना वाव मिळावा. तसेच व्यक्तिमत्त्व विकास व्हावा यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थी व शिक्षकांनी सांप्रदायिक सद्भावनेचे महत्त्व जाणून मोठ्या प्रमाणावर निधी जमा केला. याप्रसंगी निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्त्व स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच ‘विविधता मे एकता हा शो’ सादर करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख कार्यक्रमाधिकारी डॉ. स्वानंद शुक्ला, सहकार्यक्रम अधिकारी स्मिता भारद्वाज, डॉ. विशाल निंभोरे आदिंचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. एफ. एफ. मोतीवाला, डॉ. ए. एल. मोतीवाला, प्राचार्य डॉ. रिटा कुंडू, उपप्राचार्य डॉ. कमलेश बागमार, अझर सैयद आदिंसह विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Communal Goodwill Week at Motivala