शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या धडकेत वाहतूक बेट उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:34 IST

गिरणापुलाजवळ बांधण्यात आलेल्या वाहतूक बेटास गेल्या महिन्यात अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे बेट उद्ध्वस्त झाले आहे. शहराच्या प्रवेशद्वारावरच उद्ध्वस्त झालेले वाहतूक बेट बाहेरगावहून येणाऱ्या प्रवाशंचे लक्ष वेधून घेत असून, त्याची एकच चर्चा सुरू आहे.

ठळक मुद्देमालेगाव : दुरुस्ती न झाल्याने नागरिकांत नाराजी

मालेगाव कॅम्प : शहरात मनमाड चौफुलीजवळून प्रवेश केल्यानंतर गिरणापुलाजवळ बांधण्यात आलेल्या वाहतूक बेटास गेल्या महिन्यात अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे बेट उद्ध्वस्त झाले आहे. शहराच्या प्रवेशद्वारावरच उद्ध्वस्त झालेले वाहतूक बेट बाहेरगावहून येणाऱ्या प्रवाशंचे लक्ष वेधून घेत असून, त्याची एकच चर्चा सुरू आहे.शहरातील व बाहेरगावातून येणाºया नागरिकांमध्ये याची अद्याप दुरुस्ती न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वाहतूक बेट त्वरित दुरूस्त करण्याची मागणी होत आहे. नगरसेवक निधीऐवजी दुसºया निधी अंतर्गत याचे बांधकाम करण्यात आले तर हे बांधकाम करताना मुख्य रस्त्यांचा मध्यबिंदू (सेंटर) साधण्यात आला नाही तर हे बेट तांत्रिकदृट्या चुकीचे मोजमाप प्रमाणे साकारण्यात आले असा आरोप होत आहे. बांधकाम झाल्यानंतर वाहतूक बेट वाहतुकीसाठी काहीचे अडचणीचे ठरत असल्याचे वाहनचालक म्हणतात. गिरणा पुलावरून आल्याहून काही क्षणात बेट समोर दिसते. त्यामुळे चालक काहीसे बिथरतात व अपघाताची शक्यता निर्माण होते असाच अवधानाने गेल्या महिन्यात या वाहतूक बेटास अज्ञात वाहनाने धडक देऊन पोबारा केला. त्यामुळे बांधकामाचे दर्शनी भाग पूर्णत: तुटलेला आहे. अपघातानंतर दुरुस्तीसाठी मनपाचे दुर्लक्ष होत आहे. हे वाहतूक बेट खरे अर्थाने चांगल्या पद्धतीने बांधून त्यामध्ये सायकलस्वाराचा धातूचा पुतळा उभारण्यात आला आहे. सायकल चालविणे आरोग्यासाठी चांगले आहे हा संदेश सर्वत्र जातो परंतु बांधकामानंतर याचा देखभालीकडे दुर्लक्ष झाले. यामध्ये जंगली गवत उगले आहे. तर सायकल पुतळा दिसेनासा झाला आहे व अपघातानंतर याची दुरावस्था झाली आहे. शहरात पुणे, मुंबई, नाशिककडे ये-जा करणारे असंख्य वाहने येथूनच प्रयाण करतात त्यामुळे या उद्ध्वस्त बेटाचे दर्शन होत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे लवकर या वाहतूक बेटाचे पुन्हा सुशोभीकरण करण्याची मागणी होत आहे. शहर विकास आराखडा निधीअंतर्गत टेहरे फाटा, दरेगाव व गिरणापुल परिसरात शहराच्या प्रवेशद्वारांवर बेट बांधण्यात येणार आहे. त्यापैकी गिरणापूलनजीक वाहतूक बेट मागील वर्षी बांधण्यात आले परंतु हे बेट बांधण्यापूर्वीच लोकप्रतिनिधी व मनपा प्रशासन यांचा ताळमेळ बसला नाही.

टॅग्स :Accidentअपघात