शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
6
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
7
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
8
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
9
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
10
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
11
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
12
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
13
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
14
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
15
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
16
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
17
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
18
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
19
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
20
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट

एकलहरेत दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 00:48 IST

येथील औष्णिक विद्युत केंद्राला दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा सध्या शिल्लक असल्याने वीजनिर्मिती ठप्प होण्याबाबत साशंकता व्यक्त करून हा प्रकल्पच बंद करून सिन्नरच्या रतन इंडिया कंपनीच्या ताब्यातील वीज प्रकल्प ताब्यात घेण्याविषयी होत असलेल्या चर्चेतही काहीच अर्थ नसल्याचे जाणकारांचे म्हणणे असून, एकलहरे प्रकल्पाच्या वीजनिर्मितीत ज्या अडचणी आहेत, त्यापेक्षा कितीतरी पटीने रतन इंडिया कंपनीसाठीही अधिक अडचणींचा डोंगर असल्यामुळे तोंड पोळलेल्या महानिर्मितीकडून अशा प्रकारचा निर्णय होण्याची सुतराम शक्यता नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

एकलहरे : येथील औष्णिक विद्युत केंद्राला दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा सध्या शिल्लक असल्याने वीजनिर्मिती ठप्प होण्याबाबत साशंकता व्यक्त करून हा प्रकल्पच बंद करून सिन्नरच्या रतन इंडिया कंपनीच्या ताब्यातील वीज प्रकल्प ताब्यात घेण्याविषयी होत असलेल्या चर्चेतही काहीच अर्थ नसल्याचे जाणकारांचे म्हणणे असून, एकलहरे प्रकल्पाच्या वीजनिर्मितीत ज्या अडचणी आहेत, त्यापेक्षा कितीतरी पटीने रतन इंडिया कंपनीसाठीही अधिक अडचणींचा डोंगर असल्यामुळे तोंड पोळलेल्या महानिर्मितीकडून अशा प्रकारचा निर्णय होण्याची सुतराम शक्यता नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे.  महानिर्मितीला कोळसा टंचाईचे ग्रहण नवीन नाही. त्यामुळे सध्या एकलहरे वीजनिर्मिती केंद्राला दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक आहे. केंद्राला दररोज सहा ते साडेसहा हजार मेट्रिक टन कोळसा लागतो. २१० मेगावॉटच्या तीन संचांपैकी संच ३ व ४ सुरळीत सुरू आहेत, तर एक संच स्टँडबाय ठेवलेला असतो. सध्या दोन्ही संचांमधून १९०-१९५ मेगावॉट वीज उत्पादन सुरू आहे. केंद्राला लागणाऱ्या कोळशाबाबत शेड्यूल ठरविण्यात आलेले असून, दोन दिवसांचा कोळसा शिल्लक असल्यास पुढच्या दोन दिवसांसाठी लागणारा कोळसा वाहतुकीत आॅन द वे असतो. त्यामुळे केंद्राला वेळेत कोळशाचा पुरवठा होईल असे व्यवस्थापनाचे म्हणणे असले तरी, एकलहरेच्या एका संचाचा कोळसा पुरविण्याचा ठेका घेतलेल्या धारिवाल कंपनीचा करार आॅगस्ट महिन्यात संपुष्टात आला असून, त्यामुळे नवीन करार केला किंवा नाही याचा उलगडा होत नाही. तथापि, देशातील प्रत्येक वीजनिर्मिती केंद्राची वाटचाल एकलहरे केंद्राच्या बरोबरीने आजवर झालेली असल्याने त्यात नवीन काहीच नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत एकलहरे बंद करून त्या ऐवजी रतन इंडियाचा वीज प्रकल्प ताब्यात घेण्याविषयी सुरू झालेल्या चर्चेतही फारसे तथ्य नसल्याचे जाणवत आहे. एकलहरे प्रमाणेच रतन इंडियाचा प्रकल्प असून, या प्रकल्पाला कोळसा वाहतुकीची साधने नसल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून हा प्रकल्प सुरू होऊ शकलेला नाही.  तसेच शासन त्यांच्याकडून वीज विकत घेईलच, याची कोणतीच शाश्वती नाही. कोळशाप्रमाणेच दळणवळण, रस्ता, पाणी व विजेची मागणी करणारे उद्योग याची रतन इंडियाला मोठी गरज आहे. आजच्या घडीला रतन इंडियासमोर ह्याच मोठ्या अडचणी उभ्या असून, त्या सोडविल्या जातील याबाबत साशंकता आहे. अशा परिस्थितीत सेट झालेला एकलहरेचा प्रकल्प बंद करून त्याऐवजी रतन इंडियाच्या पाठीमागे महानिर्मिती धावेल यावर कोणीच विश्वास ठेवण्यास तयार नाही. त्यामुळे एकलहरेच्या प्रकल्पाबाबत कर्मचाºयांच्या मनात भीती घालविण्याबरोबरच रतन इंडियाच्या प्रकल्पात खीळ घालण्यामागे राजकारण असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.संचाची दुरुस्ती केल्यास खर्च कमी होईलएकलहरे केंद्रात सध्या आहे त्या संचांची दुरुस्ती व अद्ययावतीकरण केल्यास संचाचे आयुष्य १० ते १५ वर्षांनी वाढेल व रतन इंडियापेक्षा खर्चही कमी होईल. दरम्यानच्या काळात नवीन ६६० चा प्रकल्प किंवा २५० चे तीन संच एकलहरेसाठी द्यावेत अशी कर्मचाºयांची मागणी असून, तसे झाल्यास वीजनिर्मितीची उत्पादन क्षमता वाढीस लागून खर्चातही कपात होण्याचा दावा केला जात आहे.

टॅग्स :electricityवीजNashikनाशिक