शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेच्या कामगिरीनुसार व्हावे जागावाटप

By admin | Updated: July 21, 2014 02:01 IST

लोकसभेच्या कामगिरीनुसार व्हावे जागावाटप

 

नाशिक : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडीतील पक्षांच्या कामगिरीनुसार विधानसभा निवडणुकीचे जागावाटप व्हावे अशी आमची अपेक्षा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले़ येथील कालिदास कलामंदिरात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते़तटकरे पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने कमी उमेदवार उभे केले असतानाही अधिक खासदार निवडून आले़ त्या तुलनेत काँग्रेसला यश मिळू शकले नाही़ त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जागावाटप करताना या यशाचा विचार होणे गरजेचे आहे़ अधिक जागांसाठी आमचा आग्रह राहील असेही तटकरे म्हणाले़ गुजरातच्या विकासाबाबत बरीच चर्चा होत असली तरी नाशिकच्या विकासाचे रोलमॉडेलही चांगले असून त्याचा प्रचार होणे गरजेचे आहे़ भाजपाचे राज्यस्तरीय नेते जनतेची दिशाभूल करीत आहेत़ कार्यकर्त्यांनी नव्या उमेदीने निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आवाहनही त्यांनी केले़राज्यात गेल्या पंचवीस वर्षांतील भीषण अशी पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे़ कृषिसंजीवनी, पाणीपुरवठा अशा विविध योजना राबवून काँग्रेस-राष्ट्रवादी सरकार हे शेतकरी, तसेच राज्यातील गोरगरीब जनतेच्या पाठीशी उभे असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले़ लोकसभा निवडणुकीतील अपयशाचा विचार न करता नव्या उमेदीने विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचे आहे़ राज्य सरकारने अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतल्याचे सांगून केंद्र सरकारकडून महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम होत असल्याचे पवार म्हणाले़केंद्रातील सरकार हे हुकूमशाही प्रवृत्तीचे असून, उद्योगपतीधार्जिणे आहेत़ वीजनिर्मितीसाठी कोळसा आयात करण्याचा सल्ला, गॅसअभावी दाभोळचा प्रकल्प बंद पडला आहे़ राज्य सरकारने तयार केलेल्या विकासाच्या योजनांबाबत केंद्र सरकार आकसबुद्धीने पाहत असून, या सरकारविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आता जोमाने कामास सुरुवात केली पाहिजे़ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती वा जागावाटपांबाबत ज्येष्ठ नेते निर्णय घेतील़ मात्र पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाचे विचार, भूमिका व काम जनतेपर्यंत पोहोचून राज्यात पुन्हा आघाडी सरकारची सत्ता आणण्याचे आवाहनही पवार यांनी केले़सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, भाजपाच्या पाठीशी असलेल्या उद्योगपतींना ‘अच्छे दिन’ आले, तर शेतकऱ्यांचे ‘बुरे दिन’ सुरू झाले आहेत़ कांदा निर्यातबंदी, युरियाची भाववाढ, मुंबई-पुणे रेल्वेचे काम बंद झाले, तर कुंभमेळ्याचा साधा उल्लेखही अर्थसंकल्पात नाही़ नवीन निवडून गेलेल्या खासदारांनी याबाबत लोकसभेत प्रश्न मांडले नाहीत़ येत्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस राष्ट्रवादीचाच झेंडा विधानभवनावर असेल, असा आशावादही भुजबळ यांनी व्यक्त केला़यावेळी आमदार हेमंत टकले, कविता कर्डक, शोभा मगर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले, तर जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी केलेल्या कामांची माहिती दिली़ यावेळी व्यासपीठावर श्रीराम शेटे, देवीदास पिंगळे, उमेश पाटील, ए़ टी़ पवार, समीर भुजबळ, पंकज भुजबळ, सुनील बागुल, नीलेश राऊ त, अर्जुन टिळे, नाना महाले, दिलीप बनकर आदिंसह मान्यवर उपस्थित होते़(प्रतिनिधी)