शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त विचारांमुळेच संस्कृतीची जपणूक

By admin | Updated: September 29, 2014 00:46 IST

मीना वैशंपायन : जिल्हा साहित्यिक मेळाव्यात प्रकट मुलाखत

नाशिक : लेखकावर कुठलेच बंधन नसले पाहिजे. बंधनामुळे विचार मारले जातात आणि विचार गेले की संस्कृती धोक्यात येते. दुर्दैवाने आज अभिव्यक्ती स्वातंत्र्य केवळ कागदोपत्री दिसते. मुळात लेखकांनीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करून घेतला आहे. स्वातंत्र्याबरोबर येणारी जबाबदारी पाळली जात नाही. मुक्त विचारानेच संस्कृतीची जपणूक होत असल्याने बिनधास्तपणे लिहा, असे स्पष्ट प्रतिपादन सार्वजनिक वाचनालयाच्या ४७ व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या अध्यक्ष व ज्येष्ठ लेखक डॉ. मीना वैशंपायन यांनी प्रकट मुलाखतीत बोलताना केले.लिमये सभागृहात आयोजित जिल्हा साहित्यिक मेळाव्यात डॉ. मीना वैशंपायन यांची मुलाखत वाचनालयाचे कार्यकारिणी सदस्य स्वानंद बेदरकर यांनी घेतली. यावेळी विविध प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे देताना डॉ. वैशंपायन यांनी सांगितले, संस्कृत हा माझ्या आवडीचा विषय. बालपणीच माझ्यावर भाषांचा संस्कार होत गेला. त्यामुळे दुर्गा भागवतांवर संशोधन करताना साहित्यिक दृकप्रत्ययवादाचा अभ्यास करू शकले. त्यातून दुर्गाबार्इंचाही सहवास लाभला. स्वातंत्र्य हे मूल्य मानण्याची भावना त्यांनी माझ्यात जागृत केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची प्राणपणाने जपणूक केली पाहिजे, याचे भान त्यांनी दिले. ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकरांवरही मी लेखन केले. अनुवादाकडे वळले. अनुवाद ही सहजसाध्य कला नाही. त्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागते. अलीकडे कथा-कादंबरीत लयबद्ध लेखन होताना दिसून येत नाही, अशी खंत व्यक्त करत वैशंपायन म्हणाल्या, कथा-कादंबरीत विषयांची सर्वसमावेशकता नाही. त्यात भावनांची, विचारांची तीव्रता यायला हवी. कथा विसर्जित केली पाहिजे असे बिलकुल वाटत नसल्याचेही वैशंपायन यांनी सांगितले. एशियाटिक लायब्ररीच्या वतीने संशोधकांसाठी नवनवीन दालने खुली करून देण्यात आली असून, तरुणांसाठी शिष्यवृत्तीच्या योजना असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)