शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

शहराला मिळणार आणखी दोन एसीपी

By admin | Updated: August 20, 2015 00:04 IST

गृह विभागाचा निर्णय : वाढत्या गुन्ह्यांच्या संख्येमुळे निर्णय; पोलीस ठाण्यांचेही विभाजन

विजय मोरे  नाशिक,शहराची वाढती लोकसंख्या व गुन्हेगारी यामुळे शहर पोलीस आयुक्तालयातील दोन परिमंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यांचे विभाजन करण्यास शासनाच्या गृह विभागाने बुधवारी मंजुरी दिली आहे़ शासनाच्या या निर्णयामुळे या दोन्ही परिमंडळांमध्ये प्रत्येकी एक सहायक पोलीस आयुक्त मिळणार आहे़ यापूर्वी एकच सहायक पोलीस आयुक्ताकडे ही जबाबदारी होती़ शासनाच्या या निर्णयामुळे सहायक पोलीस आयुक्तांच्या कामाचे वाटप होऊन कामाचा ताण कमी होणार आहे़नाशिक पोलीस अधीक्षक कार्यालयाचे २९ सप्टेंबर १९९० मध्ये विभाजन होऊन शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय अस्तित्वात आले़ २००९ पर्यंत परिमंडळ एक व त्याच्या अंतर्गत दोन विभाग कार्यरत होते़ यानंतर शासनाने २२ आॅक्टोबर २००९ ला विभाग दोनसाठी पोलीस उपआयुक्तपद मंजूर केले़ तेव्हापासून आयुक्तालयात परिमंडळ एक व परिमंडळ दोन असे दोन विभाग कार्यरत आहेत़आयुक्तालयातील या दोन्ही विभागातील पोलीस उपआयुक्त व सहायक पोलीस आयुक्त यांचा दर्जा व अधिकारांमध्ये मोठ्या प्रमाणात भिन्नता असून, त्यांचे कार्यक्षेत्र एकच आहे़ त्यामुळे प्रशासकीय दृष्टिकोनातून या दोन्ही परिमंडळाचे आणखी दोन विभागांमध्ये विभाजन करण्याचा निर्णय शासनाने घेतला़ या नवीन विभागांचे कामकाज सद्यस्थितीत मंजूर असलेल्या सहायक पोलीस आयुक्तांद्वारे करावा, असेही या आदेशात म्हटले आहे़शासनाच्या विभाजनाच्या निर्णयापूर्वी परिमंडळ एकमध्ये भद्रकाली, पंचवटी, सरकारवाडा, गंगापूर आडगाव या पाच पोलीस ठाण्यांचा तर परिमंडळ दोनमध्ये सातपूर, अंबड, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड व देवळाली कॅम्प अशा सहा पोलीस ठाण्यांचा समावेश आहे़ शासनाने नवीन विभागाला मंजुरी देताना म्हसरूळ व मुंबई नाका या दोन नवीन पोलीस ठाण्यांचाही समावेश केला आहे़