शहरं
Join us  
Trending Stories
1
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
2
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
3
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
4
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
5
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
6
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
7
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
8
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
9
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
10
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
11
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
12
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
19
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
20
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्हींसाठी पोलिसांवर निविदा मुदतवाढीची नामुष्की

By admin | Updated: March 18, 2015 00:31 IST

कुंभमेळा : पोलिसांच्या नाकर्तेपणाचा प्रश्न थेट विधानसभेत

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सूचना करूनही तात्पुरते सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या पोलिसांच्या दुराग्रहाबाबत थेट विधानसभेत जाब विचारण्याचा निर्णय लोकप्रतिनिधींनी घेतला असून, यासंदर्भात तारांकित प्रश्नही उपस्थित केला आहे़ दरम्यान, नाशिक शहरात लावण्यात येणाऱ्या सुमारे ३४८ सीसीटीव्हींसाठी दुसऱ्यांदा निविदा काढण्याची नामुष्की पोलिसांवर आली आहे़ यामुळे चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या कुंभमेळ्यात सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा सीसीटीव्हींचा प्रश्न आणखी किती काळ रेंगाळणार याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत़सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला असून ध्वजारोहण १४ जुलै २०१५, प्रथम शाहीस्रान २९ आॅगस्ट, द्वितीय शाहीस्रान १३ सप्टेंबर तर तृतीय शाहीस्रान १८ सप्टेंबरला आहे़ या कालावधीत नाशिकला येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या अशा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही़ कायमस्वरूपी वा भाडेतत्त्वावरील कॅमेऱ्यांच्या खर्चाबाबत विशेष तफावत नसल्याचे समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहरातील दौऱ्यांमध्ये कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे अनेकदा सुतोवाच केले होते़ मात्र मुख्यमंत्र्याच्या या आदेशाला बगल देणारी भाडेतत्त्वावरील सीसीटीव्हीची निविदा पोलिसांना प्रसिद्ध केली़ नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये बसविण्यात येणाऱ्या भाडेतत्त्वावरील सीसीटीव्ही यंत्रणेबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदांमध्ये त्र्यंबकेश्वरच्या निविदेस तीन ठेकेदारांनी प्रतिसाद दिला मात्र नाशिक शहरासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदेस पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने मुदतवाढीची नामुष्की पोलिसांवर ओढवली आहे़ त्र्यंबकेश्वरसाठी प्रतिसाद मिळतो मात्र नाशिकसाठी नाही यामागचे कारण काय असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित केला जातो आहे़ शहरातील सुमारे ३४८ ठिकाणी हे सीसीटीव्ही कॅमेरे १५ जून ते ३० आॅक्टोबर अशा साडेचार महिन्यांच्या कालावधीसाठी बसविण्यात येणार आहेत़ दरम्यान पोलिसांनी दुसऱ्यांदा मुदतवाढ दिलेल्या निविदा भरण्याचा मंगळवारी (दि़१७) शेवटचा दिवस होता. शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेबाबत बुधवारी (दि. १८) पोलीस आयुक्तालयात बैठक होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. (प्रतिनिधी)