शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नववसाहतीत कचऱ्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 01:18 IST

मालेगाव : सोयगाव व परिसराचा झपाट्याने विस्तार होत आहे. सोयगाव परिसराचा हद्दवाढीत समावेश होऊन आता दहा वर्षांचा काल उलटला, मात्र अजूनही गटारी व मोकळ्या भूखंडांवरील कचºयाची समस्या ‘जैसे थे’च आहे.

मालेगाव : सोयगाव व परिसराचा झपाट्याने विस्तार होत आहे. सोयगाव परिसराचा हद्दवाढीत समावेश होऊन आता दहा वर्षांचा काल उलटला, मात्र अजूनही गटारी व मोकळ्या भूखंडांवरील कचºयाची समस्या ‘जैसे थे’च आहे. इतर प्रभागांच्या तुलनेत या प्रभागाचा विस्तार मोठा आहे. यात सोयगाव नववसाहत, पार्श्वनाथनगर, तुळजाई कॉलनी, पवननगर, गोविंदनगर, दौलतनगर, सिद्धिविनायक कॉलनी, स्वप्नपूर्ती नगर, आनंदनगर आदी भागांचा समावेश होतो. या प्रभागातील थोड्याफार प्रमाणात रस्ते सोडले तर बहुतांश रस्त्यांची कामे अद्यापही मार्गी लागलेली नाहीत. प्रभागातील नागरी समस्या कायम आहे. नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. प्रभागात डास प्रतिबंधक फवारणी केली जात नसल्यामुळे डासांचे साम्राज्य कायम आहे. महापालिका हद्दीत समावेश होऊन आता दहा वर्षांच्या काळ लोटला, मात्र सोयगावाची दैना काही मिटलेली नाही. येथील बहुतांश भागात गेल्या अनेक वर्षांपासून गटारी नसल्यामुळे पावसाच्या पाण्याला वाट मिळत नाही. सोयगावसह अनेक भागात रस्ते पावसामुळे उखडले आहेत. गटारीच नसल्याने रस्त्यांना नाल्यांचे स्वरूप आले आहे. लोकांना उखडलेल्या खडींमुळे अपघातांचा सामना करावा लागत आहे. पाच वर्षांत शंभर कोटींपेक्षा अधिक रक्कम रस्त्यांवर खर्च होत असताना रस्त्यांचा दर्जा कसा राखला जात नाही, हाच एकमेव नागरिकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे.----------------१ अनेक भागातील सोडिअम दिवे बंद अवस्थेत आहेत, तर अनेक ठिकाणी विजेच्या खांबांना काटेरी झुडपे, वेलींनी वेढा दिला आहे. शहरातील इंदिरानगर, पारिजात कॉलनी या भागात अनेक ठिकाणी रोहित्रांचे दरवाजे तुटलेले असून, त्यामुळे रहिवाशांना धोका उद्भवू शकतो.२ प्रभाग क्रमांक १० मध्ये पवननगर भागात तर जयरामनगर येथे महिलांसाठी उद्यान साकारले आहे. मात्र अजून काही भागातील नागरिक सुसज्ज उद्यानाच्या प्रतीक्षेत आहेत. या प्रभागातील बंद पडलेले प्राथमिक आरोग्य केंद्राची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या परिसरात मोकळे पटांगण असल्यामुळे नागरिक या ठिकाणीच कचरा टाकून दुर्गंधी पसरवित आहेत. 

टॅग्स :Nashikनाशिक