शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोत युवकाला बेदम मारहाण

By admin | Updated: July 23, 2014 00:24 IST

सिडकोत युवकाला बेदम मारहाण

सिडको : युवकास फोन करून बोलावून घेऊन तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना गणेश चौकात सोमवारी रात्री घडली़ दरम्यान, या घटनेची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़
सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडकोतील गणेश चौकात असलेल्या गणेश मंदिराचे सध्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असून, श्रावण महिन्यापर्यंत काम पूर्ण व्हावे यासाठी नागरिकांचे प्रयत्न सुरू आहेत़ त्यामध्ये चारुदत्त घोडके यांचाही समावेश आहे़ त्यांनीच चौकातील नागरिकांना एकत्र करून मंदिराचे काम करण्यास प्रवृत्त
केले़
या मंदिराच्या कामासाठी पुढाकार घेणाऱ्या चारुदत्त घोडके यांनी, मला विश्वासात घेतले नाही याचा राग गणेश सोनवणे याच्या मनात होता़ सोमवारी रात्री घोडके यांना गणेश चौकात फोन करून बोलावून घेत संशयित गणेश सोनवणे व त्याचे साथीदार नवज्योत ननरा, योगेश बागले या तिघांनी बेदम मारहाण केली़
यामध्ये घोडके यांचे डोके, हात व पायास गंभीर मार लागल्याने लेखानगर येथील लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे़ दरम्यान, या घटनेनंतर हे तिघेही फरार झाले आहेत़ या प्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक सोनोने करीत आहेत़(वार्ताहर)