शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

बालकांचा कलाविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 00:12 IST

नाशिक : ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यातून आकाशाला गवसणी घातली आहे. अनेक माध्यमांतून आणि अभ्यासातून मुलांनी स्वत:ला सिद्ध करताना आपली आणि आपल्या शाळा, महाविद्यालयांचा लौकिकदेखील वाढविला आहे. देशाचे भवितव्य म्हणून मुलांकडे पाहिले जात असल्याने त्यांच्याकडून अशा कामगिरीचेही कौतुक होणे अपेक्षित आहे. कल्पनाशक्तीच्या जोरावर प्रत्यक्षात साकारलेल्या संशोधनातून या मुलांनी स्वत:च्या क्षमता सिद्ध केल्या आहेत. त्यांच्या या भरारीची घेतलेली दखल...

नाशिक : शहरातील बाल संशोधकांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात गगनभरारी घेत विविध प्रकल्पांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान अधोरेखित केले आहे. विद्यार्थ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या समस्या आणि आव्हानांचा विचार करून २५० ग्रॅम वजनापेक्षाही कमी वजनाचे ड्रोन तयार करून भारतातील अव्वल ३० प्रकल्पांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलच्या दहावीतील विद्यार्थी रोशन शिलावट, यशपाल गुप्ता आणि रोहित माळोदे यांनी ‘माध्यम आणि करमणूक’ या विषयांतर्गत ‘डिसेंट वर्क अ‍ॅण्ड इकोनोमिक ग्रोथ’ तर दिया गुजराथी, अमृता जाधव आणि मोक्षदा चिरमाडे या विद्यार्थिनींनी ‘आपत्ती व्यवस्थापन’ विषयावर ड्रोन तयार करून राष्ट्रीय स्तरावर ‘ड्रोन चलेंज’मध्ये सहभाग नोंदवत अडीचेशे ग्रॅम वजनापेक्षाही कमी वजनाच्या ड्रोनचे सादरीकरण करण्यात यश मिळविले. या प्रकल्पातील ‘अ‍ॅडव्हानसिंग इंडिया विथ ड्रोन टेक्नॉलॉजी इनोव्हेशन’साठी पारितोषिक मिळाले आहे.असून, भारतातील अव्वल ३० प्रोजेक्टमध्ये त्याची निवड झाली आहे.ड्रोनचे कार्यविद्यार्थ्यांनी केलेला ड्रोन सुमारे २५० ग्रॅमपेक्षाही कमी वजनाचा असून, त्याचा वापर ‘सुरक्षा व्यवस्थापन’, तसेच आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये जीवनावश्यक ‘वस्तू वितरण’ यासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे या प्रकल्पाची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली असून ‘नावीन्यपूर्णत: व प्रकल्पाचे सामाजिक परिणाम यासोबत येणाऱ्या समस्यांची ओळख यासोबतच सादरीकरण कौशल्ये आणि मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूपतेवर’ आधारित या प्रकल्पाची निवड राष्ट्रीय पातळीवर करण्यात आली. या प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांना रोबोटिक्सचे प्रशिक्षक प्रतीक गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :Studentविद्यार्थीscienceविज्ञान