शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

नोकरभरतीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

By admin | Updated: April 16, 2017 00:58 IST

महापौरांचा पुढाकार : प्रभाग समितीच्या निमित्ताने चर्चा

नाशिक : अपुरे मनुष्यबळाचे कारण पुढे करत महापालिका प्रशासनाने नऊ ऐवजी सहाच प्रभाग समित्या कार्यरत ठेवण्याचा प्रस्ताव महासभेवर ठेवल्यानंतर पुन्हा एकदा नोकरभरतीचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला. यावेळी महापौर रंजना भानसी यांनी नोकरभरतीला हिरवाकंदील मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह साकडे घालण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. महापालिकेच्या महासभेवर प्रभाग समित्यांची संख्या वाढविण्याचा प्रस्ताव चर्चेसाठी आला. यावेळी अपुरे मनुष्यबळ व पायाभूत सुविधा पुरविण्यात येणाऱ्या अडचणींचे कारण दर्शवत प्रशासनाने समित्यांची संख्या वाढविण्यास असमर्थता दर्शविली. त्यातून नोकरभरतीवर चर्चा झाली. सुमारे १६०० पदे रिक्त असून, सफाई कर्मचाऱ्यांचीही संख्या अपुरी आहे. त्यामुळे नोकरभरती होण्याची गरज असल्याचे मत सदस्यांनी व्यक्त केले. प्रभाग समित्यांवर कार्यरत विभागीय अधिकारीच सक्षमपणे काम करत नसल्याने त्यांच्याऐवजी उपआयुक्त दर्जाचे अधिकारी नेमण्याचीही सूचना सदस्यांनी केली. वाढीव प्रभाग समित्यांना कर्मचारीवर्ग उपलब्ध होणार नसेल तर विषय समित्यांसाठी कर्मचारीवर्ग कुठून आणणार, असा प्रश्नही उपस्थित झाला. जलकुंभांवर सुरक्षारक्षक नेमणुकीवरूनही चर्चा झडली आणि मानधनावर नोकरभरती प्रक्रिया राबविण्याची सूचना आली. नोकरभरती झाल्यानंतर प्रभाग समित्यांची संख्या वाढविण्यास हरकत नाही, असेही मत सदस्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)