शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

निरंतर संशोधनामुळे बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:19 IST

वैद्यकशास्त्र हे निरंतर संशोधनाचे शास्त्र असून, यामुळे उपचार पद्धतीत आमूलाग्र बदल होत आहेत. अशा बदलांची तज्ज्ञांकडून मिळणारी माहिती व ज्ञानाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी परिषदांचे आयोजन महत्त्वाचे ठरते.

नाशिक : वैद्यकशास्त्र हे निरंतर संशोधनाचे शास्त्र असून, यामुळे उपचार पद्धतीत आमूलाग्र बदल होत आहेत. अशा बदलांची तज्ज्ञांकडून मिळणारी माहिती व ज्ञानाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी परिषदांचे आयोजन महत्त्वाचे ठरते. बालकांचे विविध आजार व समस्यांवरील उपचारपद्धतींमध्ये झालेल्या आमूलाग्र बदलाची देवाणघेवाण हेच ‘नाशिकॉन-२०१८’चे यश असेल, असे प्रतिपादन ‘इंडियन अकॅडमी आॅफ पेडियाट्रिक्स’ या बालरोग संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. केदार मालवतकर यांनी केले.  आधुनिक व प्रगत उपचार पद्धतीवर विचारमंथनाच्या हेतूने ‘इंडियन अकॅडमी आॅफ पेडियाट्रिक्स’ या राष्टय स्तरावरील बालरोग तज्ज्ञांच्या संघटनेच्या वतीने शहरात दोन दिवसीय ‘नाशिकॉन-२०१८’ विभागीय परिषदेला शनिवारी (दि.२३) हॉटेल एक्स्प्रेस-इनमध्ये प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी मालवतकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. जयंत रणदिवे, सचिव डॉ. अमोल पवार, रवींद्र सोनवणे, प्रशांत कुटे आदी उपस्थित होते.  ग्रामीण भागातील कुपोषण व मोबाइल, व्हिडीओ गेम्स, खाद्य सवयी यांचा शहरी भागातील मुलांच्या मानसिक व शारीरिक विकासावर होणारा परिणाम, पौगंडावस्थेतील मुलांसाठी शरीर व स्वभावातील बदल, संसर्गजन्य आजारावर प्रगत उपचार व अपस्मारावरील नवीन औषधी व उपचारपद्धती यांसारख्या विषयावर वैद्यकशास्त्रानुसार मंथनाला प्रारंभ करण्यात आला.लघुनाटिके तून प्रबोधनडेंग्यूचे उपचार व्यवस्थापन या विषयावर डॉ. गिरीश सुब्रह्मण्यम यांनी, तर त्वचा आजारावर डॉ. वसुधा बेलगमकर यांनी माहिती दिली. यकृताशी निगडित आजार व त्यावरील उपचाराबाबत डॉ. आशा अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. नवजात अतिदक्षता विषयावर डॉ. सोनू उदानी यांनी तर अपस्मार या विषयावर डॉ. निळू देसाई यांनी उपस्थित बालरोग तज्ज्ञांना माहिती दिली. दरम्यान, दोन्ही सत्रांच्यामध्ये डॉक्टरांकडून डॉक्टर-रुग्णांच्या ताणलेल्या संबंधांवर लघुनाटिका सादर करण्यात आली. या लघुनाटिकेचे दिग्दर्शन डॉ. राजेंद्र कुलकर्णी यांनी, तर लेखन डॉ. मोहन वारके यांनी केले.

टॅग्स :Medicalवैद्यकीयdocterडॉक्टर