शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
5
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
6
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
7
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
8
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
9
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
10
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
11
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
12
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
13
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
14
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
15
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
16
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
17
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
18
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
19
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
20
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

‘महाजनादेश यात्रे’निमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 01:38 IST

महाजनादेश यात्रेनिमित्त येत्या बुधवारी (दि.१८) शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून, याबाबतची अधिसूचना सोमवारी (दि.१६) शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या उपआयुक्त पौर्णिमा चौगुले यांनी जारी केली.

नाशिक : महाजनादेश यात्रेनिमित्त येत्या बुधवारी (दि.१८) शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून, याबाबतची अधिसूचना सोमवारी (दि.१६) शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या उपआयुक्त पौर्णिमा चौगुले यांनी जारी केली.बुधवारी दुपारी ३ वाजता बाइक रॅलीला  सुरु वात होणार आहे. पाथर्डी फाटा-अंबड लिंक रोड-उत्तमनगर चौक-पवन नगर-सावतानगर-सिडको त्रिमूर्ती चौक , उंटवाडी सिग्नलवरून संभाजी चौक-दक्षिण मुखी हनुमान मंदिरामार्गे मायको सर्कल-तरणतलाव सिग्नलमार्गे हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर येणार आहे. त्याचप्रमाणे ४ वाजेनंतर त्र्यंबकनाका सिग्नल-जी.पी.ओ.रोडवरून गंजमाळ सिग्नल-शालिमार-नेहरू उद्यान-शिवाजी रोड- संत गाडगे महाराज पुतळा चौक-मेन रोड-धुमाळ पॉइंट - रविवार कारंजा-पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पूल -मालेगाव स्टँड-पंचवटी कारंजा या मार्गावरून महाजनादेश यात्रेचा रोड शो होणार आहे.असा आहे पर्यायी मार्गपाथर्डीफाटा ते सिडको हॉस्पिटल या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. नागरिकांनी अंबडगाव-गरवारे टी पॉइंट-या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.सिडको रुग्णालय ते उत्तमनगर या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे. त्याकाळात नागरिकांनी आयटीआय पूल, डिजीपीनगर-२रोड, खुटवडनगररोड अशा पर्यायी मार्गाचा वापर करावा.उत्तमनगर ते त्रिमूर्तीचौक वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. नागरिकांनी विजयनगर रोड, कामटवाडे रोड अन्य पर्यायी रस्त्यांचा वापर करावा.नागरिकांनी सातपूररोड, शरणपूररोड सिग्नल पावेतो तेथून गंगापूररोड, गोविंदनगर, आयटीआय पूल मार्गाचा वापर करावा.मायको सर्कल ते त्र्यंबकनाका सिग्नलपर्यंत बंद असणार आहे. नागरिकांनी शरणपूररोड, चांडक सर्कल, सारडा सर्कल, मुंबईनाका या पर्यायी मार्गाचा वापर करावा.त्र्यंबकनाका सिग्नल ते गंजमाळ सिग्नल, शालिमार ते सारडा कन्या विद्यालय, नामको बँक ते तिरंगा चौक, मेनरोड वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. त्या काळात नागरिकांनी सारडा सर्कल, गडकरी चौक, भद्रकाली, भाजीबाजार, गाडगेमहाराज पूल, अशोकस्तंभ, गंगापूर रोड, मुंबईनाका अन्य पर्यायी मार्गांचा वापर करावा.गाडगे महाराज पुतळा ते मेनरोड धुमाळ पॉइंट, रविवार कारंजा- होळकर पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असणार आहे. त्या काळात नागरिकांनी गंजमाळ सिग्नल, सारडा सर्कल, शालिमार, रेडक्रॉस सिग्नल, वकीलवाडी, अशोकस्तंभ, गंगापूररोड अन्य पर्यायी मार्गांचा वापर करावा.होळकर पूल ते पंचवटी कारंजा वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असणार आहे. नागरिकांनी अशोक स्तंभ,गंगापूररोड, मखमलाबाद रोड, पेठरोडसह अन्य पर्यायी मार्गाचा वापर करावा.

टॅग्स :BJPभाजपाTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस