शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
2
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
3
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
4
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
5
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
6
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
7
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
8
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
9
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
10
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
11
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
12
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
13
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
14
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
15
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
16
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
17
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
18
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
19
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
20
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
Daily Top 2Weekly Top 5

सेनेपुढे बालेकिल्ला राखण्याचे आव्हान

By admin | Updated: January 15, 2017 00:30 IST

मनसेवर उमेदवार शोधण्याची वेळ : दुरंगी लढत होण्याची शक्यता, इच्छुकांमध्ये चढाओढ

गणेश धुरी नाशिक
गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ताब्यात असलेला एकलहरा गट या पंचवार्षिकमध्ये टिकविणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी अवघड होऊन बसले आहे. कारण ज्या दोन पंचवार्षिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा परिषद सदस्य निवडून आले ते खासदार हेमंत गोडसे यंदा शिवसेनेत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या गटातून नेतृत्व व उमेदवार शोधण्याची वेळ आली
आहे.
एकलहरा गटाचे राजकारण संसरी गावाभोवती फिरत असल्याचा इतिहास आहे. पारंपरिक शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणार हा गट गेल्या दोन पंचवार्षिकपासून आजी-माजी खासदार गोडसे द्वयींमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ताब्यात राहिला आहे. यंदा मात्र हा गट शिवसेना परत मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करेल, हे नक्की.
एकलहरा गटावर माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यासह आजी-माजी खासदारांचे प्रभुत्व आहे. खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांच्याबरोबरच शिवसेना जिल्हाप्रुमख विजय करंजकर, राजाराम धनवटे, अनंत जगताप, भगवान जुंद्रे, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, शंकर धनवटे, नितीन जगताप, बाळासाहेब म्हस्के, प्रकाश म्हस्के यांचे नेतृत्व मानले जाते.
आता गटाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. या गटात शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी व कॉँग्रेस यांच्यात चौरंगी लढतीची शक्यता वर्तविली जात असली तरी या गटाचा
इतिहास पाहता यंदाची लढत दुरंगीच होईल, असे बोलले जाते.