शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शंभराच्या नोटा एटीएममध्ये बंद

By admin | Updated: November 13, 2016 00:18 IST

शंभराच्या नोटा एटीएममध्ये बंद

 नाशिक : खुल्या बाजारात शंभर व पन्नासच्या नोटांची टंचाई असल्याचे पाहून बॅँकांनी त्यांच्या एटीएममध्ये शंभराच्या नोटांचा भरणा केला असला तरी, त्याचा उपयोग फक्त एटीएमधारकांनाच होत असून, ज्यांच्याकडे एटीएम नाही अशांना मात्र अजूनही नोटांच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. तीन दिवसांपासून बॅँका व पोस्ट कार्यालयातून नागरिकांना चलनातील नोटा बदलून देण्यास सुरुवात झालेली असली तरी, दोन हजाराची नवीन नोट दिली जात आहे; मात्र ही नोट बाजारात चालविण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. दोन हजार रुपयांसाठी सुटे नसल्याची सबब पुढे करून नवीन नोट बाजारात येऊनही त्याचा उपयोग होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. शासनाने शंभर, पन्नासच्या नोटा चलनात कायम ठेवूनही त्याचा तुटवडा भासत आहे, त्यामुळे नवीन नोटांचे चलन होण्यास अडचणी निर्माण झालेल्या आहेत. या संदर्भातील तक्रारींची दखल घेत बॅँकांनी एटीएममध्ये शंभराच्या नोटा भरल्या असल्या तरी, त्याचा वापर फक्त एटीएमधारकांनाच होत आहे. बाजारात शंभराच्या नोटा मुबलक चलनात आल्या तरच नवीन नोटांचाही वापर सुकर होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)