शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सभागृहात बसणार सीसीटीव्ही कॅमेरे?

By admin | Updated: June 23, 2015 01:35 IST

सभागृहात बसणार सीसीटीव्ही कॅमेरे?

नाशिक : जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यामध्येच शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा असून, आगामी सर्व साधारण सभा अर्थात आमसभा सीसीटीव्हीच्या नजरेखाली होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात सीसीटीव्ही बसविण्याबाबत प्रशासनाला एका पदाधिकाऱ्याने पत्र दिल्याचे समजते. काही दिवसांपूर्वीच झालेल्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या सर्वसाधारण सभेत नेमके नियोजन काय घडले? त्यानुसार इतिवृत्त तयार करण्यात आले की नाही? त्यात काही दुरुस्ती करून इतिवृत्तात बिघाड करण्यात आला काय?अशा अनेक शंका काही पदाधिकाऱ्यांनी घेतल्या असून, त्यानुसार प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. मुळातच वार्षिक अर्थसंकल्पाच्या विशेष सर्वसाधारण सभेत कोेणत्या विभागांची किती कपात झाली? कुठला निधी कुठे वळविण्याचा निर्णय झाला? याबाबत सविस्तर माहिती मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे आहे. आता गेल्या काही दिवसांपासून या इतिवृत्तावरून पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफूस सुरू आहे. त्यामुळेच की काय, एका पदाधिकाऱ्याने चक्क प्रशासनाला नवीन प्रशासकीय इमारतीतील सभागृहात सीसीटीव्ही कॅमरे बसविण्याबाबत पत्र देऊन लेखी मागणी केल्याचे समजते. अर्थात सीसीटीव्ही कॅमेरे हे बैठकीत काय निर्णय झाले? याची सचित्र माहिती मिळण्यासाठीच बसविण्याच्या दृष्टीने हे कॅमेरे बसविण्यात पत्र देण्यात आल्याचे कळते. आता या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मागणीमुळे आधीच ध्वनिचित्रीकरणाच्या छायेखाली असलेली सर्वसाधारण सभा आता छायाचित्रणाखाली येण्याची चिन्हे आहेत.(प्रतिनिधी)