शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवार लादणार नाही

By admin | Updated: August 25, 2016 00:51 IST

भाई जगताप : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी आढावा बैठक

 नाशिक : येत्या जानेवारी-फेबु्रवारी २०१७मध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला केंद्रस्थानी ठेवूनच उमेदवारी दिली जाईल. कोणताही उमेदवार स्थानिकांवर लादला जाणार नाही, असे प्रतिपादन कॉँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक आमदार भाई जगताप यांनी केले.जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्या वतीने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीच्या आढावा बैठकीत आमदार जगताप यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कॉँग्रेस भवनात आमदार भाई जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होेते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पक्षनिरीक्षक डी.जी. पाटील, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद अहेर, महिला जिल्हाध्यक्ष डॉ. ममता पाटील, निवृत्ती डावरे, श्याम तायडे, भाऊसाहेब बोरस्ते, सुनील आव्हाड, भास्करराव बनकर आदि उपस्थित होते. आमदार भाई जगताप यांनी पुढे सांगितले की, पक्षाच्या घटनेतील बदलानुसार राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात एकाच वेळी निरीक्षक पाठविण्याचा निर्णय प्रदेश कॉँग्रेसने घेतला. जिल्ह्णातील १५ मतदारसंघात पक्ष निरीक्षकांच्या नियुक्त्या झाल्या असून, ते ते निरीक्षक त्या त्या मतदारसंघात किमान दहा दिवस राहतील. त्यांच्या कामकाजावर पक्षाची करडी नजर राहील. निरीक्षकांनी त्या त्या तालुक्यात बूथ कमिट्यांपासून काम उभे करायचे आहे. पक्षाचे उमेदवारदेखील नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय पॅनलकडून अंतिम केले जातील. पक्षाकडून त्या त्या मतदारसंघात कोणताही उमेदवार वरून लादला जाणार नाही. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी राष्ट्रवादीने पक्षाचे नुकसान केल्याचे सांगितले. मात्र आगामी निवडणुकांमध्ये युतीला शह देण्यासाठी काही ठिकाणी आघाडी करण्याची गरज असल्याचे सांगितले. बैठकीस जि. प. सदस्य प्रा. अनिल पाटील, माजी उपाध्यक्ष दिगंबर गिते, निर्मला खर्डे, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)