शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवार सेनेचे नव्हे अखेर अपक्षच

By admin | Updated: February 7, 2017 00:39 IST

प्रभाग ३० : शिवसेनेवर नामुष्की; दावा फेटाळला

इंदिरानगर : प्रभाग क्रमांक ३० मधून शिवसेनेकडून अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचे एबी अर्ज अखेर बाद ठरवत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या उमेदवारांना शिवसेना पुरस्कृत नव्हे तर अपक्ष उमेदवार म्हणूनच घोषित केल्याने सेनेला या प्रभागात अधिकृत उमेदवार लाभले नाही. येथील उमेदवारांना पक्षाचे अधिकृत पुरस्कृत म्हणून जाहीर करावे, यासाठी शिवसेनेकडून करण्यात आलेले प्रयत्न फोल ठरले.  पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक ३० मधून शिवसेनेकडून अर्ज दाखल केलेले संजय चव्हाण, रशिदा शेख, शकुंतला खोडे आणि नीलेश चव्हाण यांनी एबी अर्जाची झेरॉक्स जोडल्याने त्यांचे अर्ज गेल्या शनिवारीच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अपक्ष म्हणून ग्राह्य धरले जातील, असे जाहीर केले होते. परंतु संजय चव्हाण यांनी बाजू मांडण्यासाठी सोमवारपर्यंतची मदत मागून घेतली होती. अधिकाऱ्यांपुढे आज संजय चव्हाण आणि भाजपाचे सतीश सोनवणे यांच्या वकिलांनी बाजू मांडली. महापालिका निवडणुकीसाठी प्राप्त उमेदवारांच्या अर्जांची छाननी होऊन प्रभाग क्रमांक ३० मध्ये अनुसूचितसाठी नीलेश चव्हाण, ओबीसी महिला प्रवर्गातून शकुंतला खोडे, सर्वसाधारण महिला गटातून विद्यमान नगरसेवक रशिदा शेख आणि सर्वसाधारण जागेसाठी संजय चव्हाण यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र या चौघांनीही उमेदवारी अर्ज दाखल करताना एबी अर्जाची झेरॉक्स प्रत जोडली होती. शिवाय त्यांच्या एबी अर्जावरील शिक्का निळा नसल्याने तसेच स्वाक्षरीदेखील काळ्या शाहीने करण्यात आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या चारही उमेदवारांना पक्ष चिन्हावर निवडणूक लढवता येणार नसल्याचा निकाल देत त्यांची उमेदवारी अपक्ष म्हणूनजाहीर केली होती. यावेळी संजय चव्हाण यांच्या वकिलांनी बाजू मांडण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत मागितली होती. त्यानुसार आज या प्रकरणावर सुनावणी झाली. सकाळी ११ वाजता पूर्व विभागीय निवडणूक कार्यालयात संजय चव्हाण आणि भाजपाचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या वकिलांनी सुमारे पाऊणतास युक्तिवाद केला. त्यानुसार एबी अर्जाच्या झेरॉक्सवरून तसेच त्याच प्रभागातील इतर तिघांप्रमाणे चव्हाण यांनाही नियम लावण्यात यावा, असा युक्तिवाद सोनवणे यांच्या वकिलांनी केला.