शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात तोतया जिल्हाधिकाऱ्याचा पर्दाफाश

By admin | Updated: August 25, 2016 23:51 IST

नोकरीचे आमिष : बेरोजगारांना लाखोंचा गंडा

सटाणा : जिल्हाधिकारी असल्याचे भासवून सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या तोतया जिल्हाधिकाऱ्याचा सटाणा पोलिसांनी पर्दाफाश केला. या घटनेमुळे कसमादे पट्ट्यात खळबळ उडाली आहे. सटाणा पोलिसांनी या तोतया जिल्हाधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या असून, सटाणा न्यायालयाने देवानंद साळवे (रा. अभिमन्यूनगर, बर्फ कारखान्याजवळ, सटाणा. मूळ राहाणार व्यारा, जिल्हा वापी) याला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.सटाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव, सिन्नर आणि चांदवड तहसील कार्यालयाचा कारभार स्वत:च्या ताब्यात असल्याची बतावणी करून तोतया साळवे सटाणा शहरात गत १ महिन्यापासून भाड्याच्या आलिशान बंगल्यात वास्तव्य करत होता. इनोव्हा गाडी भाड्याने घेण्याच्या निमित्ताने ओळख झालेल्या सटाणा येथील प्रशांत दिलीप कोठावदे यांच्याशी साळवे याची ओळख झाली. याच ओळखीतून कोठावदे यांच्याशी जवळीक वाढवत मी कलेक्टर आहे आणि तुमचे सहा तालुके माझ्या अधिपत्याखाली आहेत आणि कळवण तहसील कार्यालयात सिनिअर क्लार्कची भरती करायची असून, त्या जागा भरण्याचा सर्व अधिकार मला आहे. जर तुमच्याकडे कोणी इच्छुक उमेदवार असेल तर पाच लाखांत त्याचे काम होईल, असे आमिष तोतया साळवे याने कोठावदे यांना दाखविले.वेळोवेळी स्वत:चे नाव मोबाइल क्रमांक आणि गाड्या बदलून साळवे याने महाराष्ट्रासह गुजरातमध्येही अनेक सुशिक्षित तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक केली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. साळवे यांनी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केली असेल तर सटाणा पोलिसांची संपर्क साधण्याचे आवाहन सटाणा पोलिसांनी केले आहे. (वार्ताहर)