भाविकांच्या बसला अपघात; चालकाने प्रसंगावधानाने जीवीतहानी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 17:58 IST2019-06-09T17:54:40+5:302019-06-09T17:58:17+5:30
नाशिक : नाशिककडून सप्तशृंगी गडावर भाविकांना घेऊन जाणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बसची चाके अचानकपणे जाम होऊन दिंडोरीरोडवर बसला अपघात झाल्याची ...

भाविकांच्या बसला अपघात; चालकाने प्रसंगावधानाने जीवीतहानी टळली
नाशिक :नाशिककडून सप्तशृंगी गडावर भाविकांना घेऊन जाणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बसची चाके अचानकपणे जाम होऊन दिंडोरीरोडवर बसला अपघात झाल्याची घटना रविवारी (दि.९) सकाळी घडली. यावेळी बसमध्ये बसलेले दहा प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ जिल्हा शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात जीवीतहानी टळली असली तरी महामंडळाच्या बसेसची देखभालदुरूस्ती व दर्जाचा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. ‘एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास’ असे घोषवाक्य असलेल्या परिवहन महामंडळाला मात्र वाहनांची देखभालदुरूस्तीचा दर्जा राखण्यास अपयश येत असल्याचे दिसते.
याबाबत मिळालेली माहिती अशी, रविवारी नाशिक आगाराची बस (एम.एच.४० एन ८८०५) सीबीएस बसस्थानकातून सकाळी आठ वाजेच्या सुमारास वणी सप्तशृंगी गडाकडे ४५प्रवाशांना घेऊन निघाली. म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास दिंडोरीरोडवर अचानकपण बसचे चाक जाम झाल्याचे बसचालक एम.जी.गायकवाड यांच्या लक्षात आले. चालकाने आपल्या कौशल्याचा वापर करत प्रसंगावधान राखून वेगावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत बस रस्त्यालगत असलेल्या पावसाचे पाणी वाहून नेणाºया चारीत उतरविली. त्यामुळे चालक गायकवाड यांच्यासह बसमध्ये बसलेले दहा प्रवासी जखमी झाले तर वाहक अंबादास गवळी यांच्यासह बसमधील ३५ प्रवासी सुखरूप आहेत. कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास म्हसरूळ पोलीस करत आहेत.