घरफोडीत सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 14:11 IST2018-08-22T14:09:33+5:302018-08-22T14:11:13+5:30
नाशिक : घराच्या खिडकीचे गज वाकवून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व गृहोपयोगी वस्तू चोरून नेल्याची घटना नाशिककरोडच्या जयभवानीरोड परिसरात घडली आहे़

घरफोडीत सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी
ठळक मुद्दे३३ हजार रुपयांचा मुद्देमाल ; घरफोडीचा गुन्हा दाखल
नाशिक : घराच्या खिडकीचे गज वाकवून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व गृहोपयोगी वस्तू चोरून नेल्याची घटना नाशिककरोडच्या जयभवानीरोड परिसरात घडली आहे़
जाचकनगरमधील साहिल भालेराव यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार १८ व १९ आॅगस्ट रोजी चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे गज वाकवून घरात प्रवेश केला़ तसेच घरातील १५ हजार रुपये किमतीची साडेबारा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, पंधरा हजार रुपयांची रोकड, सेट टॉप बॉक्स, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर असा ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला़
या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़