प्रेस कामगार सरचिटणीसपदी बोराडे विजयी

By Admin | Updated: March 4, 2017 01:28 IST2017-03-04T01:28:23+5:302017-03-04T01:28:36+5:30

उपनगर : गांधीनगर मुद्रणालय प्रेस कामगार युनियनच्या द्विवार्षिक निवडणुकीत सरचिटणीसपदी मनोहर बोराडे व विविध सेक्शन प्रतिनिधी निवडून आले.

Borada won the press for the general secretary | प्रेस कामगार सरचिटणीसपदी बोराडे विजयी

प्रेस कामगार सरचिटणीसपदी बोराडे विजयी

 उपनगर : गांधीनगर मुद्रणालय प्रेस कामगार युनियनच्या द्विवार्षिक निवडणुकीत सरचिटणीसपदी मनोहर बोराडे व विविध सेक्शन प्रतिनिधी निवडून आले.
गांधीनगर मुद्रणालय प्रेस कामगार युनियनच्या ८ जागांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी गुरूवारी गांधीनगर वेल्फेअर हॉलमध्ये सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आली. त्यानंतर लागलीच मतमोजणी प्रक्रिया पार
पडली.
यामध्ये युनियनच्या सरचिटणीसपदी मनोहर बोराडे १२२ मते मिळवून विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी एस. बी. साळुंके यांना ६७ मते मिळाली. तसेच बार्इंडिंग विभाग शशिकांत जाधव (४०), भिका जाधव (३२), फोटोलिटो विभाग हरिष परदेशी (१५), आॅफिस ग्रुप संजय घुगे (४३), रवि आवारकर (४२), सुपरवायझर विभाग समद शेख (१४), मशीन विभाग सुनील पवार ४७ मते मिळवून विजयी झाले. निवडणूक अधिकारी म्हणून पी. व्ही. कोहली, मोहन माखिजानी यांनी काम पाहिले. (वार्ताहर)

Web Title: Borada won the press for the general secretary