शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

माणकेश्वर वाचनालयाचे संचालक मंडळ बिनविरोध

By admin | Updated: July 30, 2014 00:21 IST

माणकेश्वर वाचनालयाचे संचालक मंडळ बिनविरोध

निफाड : येथील शतकमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या श्री माणकेश्वर वाचनालयाच्या संचालक मंडळाची सन २०१४-२०१९ सालासाठी पंचवार्षिक निवड बिनविरोध पार पडली. वाचनालयाचे विद्यमान अध्यक्ष मधुकर शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ९५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली.सभेच्या इतिवृत्ताचे चिटणीस दत्ता उगावकर यांनी वाचन केल्यानंतर पंचवार्षिक निवड प्रक्रियेवर चर्चा करण्यात आली. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार यांनी आपली भूमिका विशद केली व निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानुसार सभासदांनी मधुकर शेलार, दत्ता उगावकर, चंद्रकांत पानसरे यांना इच्छुकांच्या आलेल्या नावांमधून २०१४ ते २०१९ साठी संचालक मंडळ ठरविण्यासाठी सर्वाधिकार दिले.या समितीने मधुकर शेलार, दत्ता उगावकर, चंद्रकांत पानसरे, सीताराम गायकवाड, राजेंद्र सोमवंशी, राजेंद्र खालकर, बाळासाहेब खालकर, अ‍ॅड. प्रवीण ठाकरे, सुनील कुमावत, तनवीर राजे, सुनील निकाळे, स्त्री राखीवमध्ये सुजाता तनपुरे, डॉ. मेघा जंगम, स्वीकृत सदस्य म्हणून डॉ. उत्तम डेर्ले, मोहन पाटील, मालती वाघावकर यांची निवड झाल्याचे जाहीर केले.या सभेमध्ये सरपंच अनिल कुंदे, उपसरपंच दिलीप कापसे, शिवाजी ढेपले, अ‍ॅड. भरत ठाकरे, प्रकाश अडसरे, प्रवीण तनपुरे, बाळासाहेब रंधवे, वसंत कापसे, मधुकर उगले, बाळासाहेब कर्डिले यांनी मनोगत व्यक्त केले.या सभेप्रसंगी वाचनालयाकडून दिला जाणारा उत्कृष्ट वाचक पुरस्कार आजीव सभासद अ‍ॅड. प्रमोद अहेर यांना प्रदान करण्यात आला. तसेच वाचनालयाचे आजीव सभासद बबन सानप यांची व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेच्या विश्वस्तपदी, दिंडोरीच्या सरपंचपदी संदीप तासकर यांची कुंदेवाडीच्या उपसरपंचपदी वैकुंठ पाटील यांची निवड झाल्याबद्दल वाचनालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रारंभी वाचनालयाच्या संस्थापकांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर वाचनालयाचे माजी अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक कै. बा.य. परिट यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राजेंद्र सोमवंशी यांनी सूत्रसंचालन केले व राजेंद्र खालकर यांनी आभार मानले.