शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मायलेकावर काळाचा घाला

By admin | Updated: January 5, 2016 00:03 IST

खेतवाणी लॉन्सजवळील घटना : ट्रकचालकास अटक

सिडको : नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी जात असलेल्या मायलेकास भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने या अपघातात मानकुंवरबाई बोथरा (६०) व त्यांचा मुलगा विवेक बोथरा (३५) यांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. गंगापूररोड परिसरातील आकाशवाणी केंद्राजवळ राहणाऱ्या मानकुंवरबाई बोथरा व त्यांचा मुलगा विवेक हे सिडकोतील त्यांचे नातेवाईक मनसुखलाल छोरिया यांच्या अंत्यसंस्काराला जाण्यासाठी दुचाकीने (एमएच १५, बीयू/४५९९) सिडकोकडे जात होते. उंटवाडीरोडवरील खेतवाणी लॉन्ससमोर बोथरा मायलेक रस्त्याच्या कडेला उभे असतानाच सिटी सेंटर मॉलकडून त्रिमूर्ती चौकाकडे जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने (एमएच ०४, डीके ८३५६) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात बोथरा मायलेकाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या धडकेत दुचाकीवर बसलेल्या मानकुंवरबाई बोथरा (६०) व त्यांचा मुलगा विवेक बोथरा (३५) या दोघाही मायलेकाच्या डोक्यास जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला़ तर अपघातानंतर ट्रकचालक फरार होत असतानाच नागरिकांनी ट्रकचा पाठलाग करून शिवशक्ती चौकात ट्रकला पकडले़ या प्रकरणात मात्र ट्रकचालक फरार झाला होता़ दरम्यान, या अपघातानंतर खेतवाणी लॉन्ससमोर सुमारे अर्धातास वाहतूक खोळंबली होती. मायलेकाच्या या दुर्दैवी अपघातामुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विवेकचे किराणा दुकान असून, त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. सायंकाळी मायलेकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. छोट्या सार्थकने आपल्या वडिलांना अग्निडाग देताच उपस्थितांची मने हेलावली. दरम्यान, या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.