भाजपाचे आज ‘मिशन नाशिक’

By Admin | Updated: April 2, 2016 00:02 IST2016-04-01T23:29:04+5:302016-04-02T00:02:21+5:30

भाजपाचे आज ‘मिशन नाशिक’

BJP's 'Mission Nashik' today | भाजपाचे आज ‘मिशन नाशिक’

भाजपाचे आज ‘मिशन नाशिक’

नाशिक : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक शनिवार (दि. २) व रविवार (दि. ३) नाशिकमध्ये होणार असून, या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. बैठकीच्या निमित्ताने नाशिकमध्ये अनेक मंत्री दाखल होणार असून, शनिवारी होणाऱ्या बैठकीत नाशिकसह उत्तर महाराष्ट्रासाठी अनेक सवलतींच्या घोषणा मुख्यमंत्र्यांकडून केल्या जाणार आहेत.
नाशिकमध्ये १९९२ मध्ये भाजपाची प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली होती. या बैठकीत ना. स. फरांदे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर २००० मध्ये भाजपाची बैठक भाऊसाहेब फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर आता तब्बल पंधरा वर्षांनी बैठक होणार आहे. पंचवटीतील स्वामीनारायण मंदिरातील सभागृहात या बैठका होणार आहे. (पान ५ वर)

Web Title: BJP's 'Mission Nashik' today