शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची पहिली यादी २७ जानेवारीस

By admin | Updated: January 20, 2017 01:20 IST

मुलाखती पूर्ण : सातशे इच्छुकांच्या मुलाखती

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती संपल्यानंतर आता ही यादी प्रदेश कार्यालयाकडे शिफारस करण्यात येणार असून, येत्या २७ जानेवारीस पहिली यादी घोषित होणार आहे. गुरुवारी मुलाखतीचे कामकाज संपल्यानंतर प्रदेश संघटनमंत्री रवि भुसारी यांनी शिफारशीसह सर्व अहवाल ताब्यात घेतला असून, शुक्रवारी तो मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांना सादर करण्यात येणार आहे. महापालिकेच्या १२२ प्रभागांसाठी भाजपाने तीन दिवस इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. सुमारे सातशे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पहिल्या दिवशी प्रभाग क्रमांक १ ते १०, दुसऱ्या दिवशी प्रभाग क्रमांक ११ ते २० आणि तिसऱ्या दिवशी २१ ते ३१ क्रमांकाच्या प्रभागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. प्रदेश संघटनमंत्री किशोर काळकर, शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे व डॉ. अपूर्व हिरे तसेच प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, उपाध्यक्ष वसंत गिते, सुनील बागुल यांच्यासह अन्य आघाड्यांच्या प्रमुखांनी या मुलाखती घेतल्या. यावेळी सलग तीन दिवस या मुलाखती झाल्यानंतर शिफारस केलेल्या उमेदवारांची नावे शुक्रवारी प्रदेश कार्यालयात सादर होणार आहेत. ज्या उमेदवारांची नावे सर्व सहमतीने ठरली आहेत, अशा निर्विवाद उमेदवारांची पहिली यादी २७ जानेवारी रोजी घोषित करण्यात येणार आहेत. किमान ५० टक्के उमेदवारांचा यात समावेश असेल, त्यानंतर उर्वरित उमेदवारांचा समावेश असणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींमुळे सध्या उमेदवारी कुणाला मिळते याकडे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)