नाशिकरोडमध्ये बाइक जागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:08 IST2017-08-07T00:07:16+5:302017-08-07T00:08:31+5:30

मुंबईत क्रांतीदिनी ९ आॅगस्ट रोजी सकल मराठा समाजातर्फे काढण्यात येणाºया मराठा क्रांती मूक मोर्चाच्या जनजागृतीसाठी नाशिकरोड मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीच्या माध्यमातून रविवारी (दि.६) नाशिकरोड परिसरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत मराठा नगरसेवकांसह अन्य लोकप्रतिनिधींनीही सहभाग घेऊन परिसरातील मराठा समाज बांधवांना मुंबईतील मराठा क्रांती मूक मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले.

Bike Awakening Rally in Nashik Road | नाशिकरोडमध्ये बाइक जागृती रॅली

नाशिकरोडमध्ये बाइक जागृती रॅली

नाशिक : मुंबईत क्रांतीदिनी ९ आॅगस्ट रोजी सकल मराठा समाजातर्फे काढण्यात येणाºया मराठा क्रांती मूक मोर्चाच्या जनजागृतीसाठी नाशिकरोड मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीच्या माध्यमातून रविवारी (दि.६) नाशिकरोड परिसरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत मराठा नगरसेवकांसह अन्य लोकप्रतिनिधींनीही सहभाग घेऊन परिसरातील मराठा समाज बांधवांना मुंबईतील मराठा क्रांती मूक मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले.
मुंबईतील या राज्यस्तरीय मोर्चाच्या जनजागृतीसाठी शहरासह जिल्हाभरातील विविध भागातून बैठका, बाइक रॅली काढण्यात येत आहे. अशाच प्रकारे नाशिकरोड परिसरात रविवारी बाइक रॅली काढून मराठा क्रांती मोर्चाच्या स्वयंसेवकांनी जनजागृती केली. सकल मराठा समाजातील तरुणांसह महिला व ज्येष्ठ नागरिकांनीही रॅलीत सहभागी होत नाशिकरोड, जेलरोड, देवळाली गाव, विहितगाव परिसरातील मळे भागातून बाइक रॅली काढली.

Web Title: Bike Awakening Rally in Nashik Road