शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजना दुरुस्ती अंदाजपत्रकासाठी भुजबळांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 17:08 IST

निवेदन सादर : पाणी असूनही लासलगावकरांची परवड

ठळक मुद्दे३ कोटी ८३ लाख रु पयांचे अंदाजपत्रक ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग निफाड यांनी शासनाकडे सादर केलेले आहे

लासलगाव : लासलगाव, विंचूरसह १६ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन जीर्ण झालेली असल्याने ती वारंवार फुटत आहे. सदर पाईपलाईन बदलण्याकरिता अंदाजपत्रक शासनाकडे सादर केलेले असून अद्याप त्यास मंजुरी मिळालेली नाही. या दुरु स्ती अंदाजपत्रकास तातडीने मंजुरी मिळावी, या आशयाचे निवेदन पाणीपुरवठा योजना देखभाल समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना दिले आहे.येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे छगन भुजबळ यांची कॅबिनेटमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर ते पहिल्यांदाच मतदार संघात आले होते. यावेळी लासलगावकरांतर्फे माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य कुसुमताई होळकर यांनी त्यांचे स्वागत केले. येवला लासलगाव सह १६ गावांना नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून पाणी पुरवठा केला जातो. या हंगामात नांदूर मधमेश्वर बंधारा पूर्ण क्षमतेने भरलेला असतानाही केवळ जीर्ण झालेल्या पाईपलाईन मुळे या योजनेतील समाविष्ट गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यास मोठे श्रम घ्यावे लागत आहे . परिणामी तीन-चार दिवस पाणीपुरवठा बंद ठेवून पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर करावे लागत असल्याने पाणी असूनही ते नागरिकांपर्यंत पोहोचू शकत नाही. सोळा गाव पाणी योजनेतील पाईप लाईन कामाचे दुरु स्ती होण्यासाठी ३ कोटी ८३ लाख रु पयांचे अंदाजपत्रक ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग निफाड यांनी शासनाकडे सादर केलेले आहे. मात्र अनेक दिवसांपासून पाठपुरावा करून देखील या अंदाजपत्रकास शासन स्तरावर मंजुरी मिळालेली नाही. या अंदाजपत्रकास तातडीने मंजुरी मिळावी या मागणीचे निवेदन छगन भुजबळ यांना लासलगावच्या माजी सरपंच कुसुमताई होळकर यांच्या नेतृत्वा खाली देण्यात आले. याप्रसंगी सरपंच संगीता शेजवळ, सौ वेदिका होळकर, ग्रामपंचायत सदस्य स्नेहल ब्रम्हेचा , श्वेता मालपाणी, श्रीमती गुलशन मन्सुरी , ललिता जाधव, रोहिणी मोरे , राणी शहा यांच्यासह परिसरातील महिला उपस्थित होत्या.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी