पाणीपुरवठा योजना दुरुस्ती अंदाजपत्रकासाठी भुजबळांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 05:08 PM2019-12-10T17:08:34+5:302019-12-10T17:08:51+5:30

निवेदन सादर : पाणी असूनही लासलगावकरांची परवड

Bhujbal receives data for water supply scheme repair budget | पाणीपुरवठा योजना दुरुस्ती अंदाजपत्रकासाठी भुजबळांना साकडे

पाणीपुरवठा योजना दुरुस्ती अंदाजपत्रकासाठी भुजबळांना साकडे

Next
ठळक मुद्दे३ कोटी ८३ लाख रु पयांचे अंदाजपत्रक ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग निफाड यांनी शासनाकडे सादर केलेले आहे

लासलगाव : लासलगाव, विंचूरसह १६ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन जीर्ण झालेली असल्याने ती वारंवार फुटत आहे. सदर पाईपलाईन बदलण्याकरिता अंदाजपत्रक शासनाकडे सादर केलेले असून अद्याप त्यास मंजुरी मिळालेली नाही. या दुरु स्ती अंदाजपत्रकास तातडीने मंजुरी मिळावी, या आशयाचे निवेदन पाणीपुरवठा योजना देखभाल समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना दिले आहे.
येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे छगन भुजबळ यांची कॅबिनेटमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर ते पहिल्यांदाच मतदार संघात आले होते. यावेळी लासलगावकरांतर्फे माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य कुसुमताई होळकर यांनी त्यांचे स्वागत केले. येवला लासलगाव सह १६ गावांना नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून पाणी पुरवठा केला जातो. या हंगामात नांदूर मधमेश्वर बंधारा पूर्ण क्षमतेने भरलेला असतानाही केवळ जीर्ण झालेल्या पाईपलाईन मुळे या योजनेतील समाविष्ट गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यास मोठे श्रम घ्यावे लागत आहे . परिणामी तीन-चार दिवस पाणीपुरवठा बंद ठेवून पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर करावे लागत असल्याने पाणी असूनही ते नागरिकांपर्यंत पोहोचू शकत नाही. सोळा गाव पाणी योजनेतील पाईप लाईन कामाचे दुरु स्ती होण्यासाठी ३ कोटी ८३ लाख रु पयांचे अंदाजपत्रक ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग निफाड यांनी शासनाकडे सादर केलेले आहे. मात्र अनेक दिवसांपासून पाठपुरावा करून देखील या अंदाजपत्रकास शासन स्तरावर मंजुरी मिळालेली नाही. या अंदाजपत्रकास तातडीने मंजुरी मिळावी या मागणीचे निवेदन छगन भुजबळ यांना लासलगावच्या माजी सरपंच कुसुमताई होळकर यांच्या नेतृत्वा खाली देण्यात आले. याप्रसंगी सरपंच संगीता शेजवळ, सौ वेदिका होळकर, ग्रामपंचायत सदस्य स्नेहल ब्रम्हेचा , श्वेता मालपाणी, श्रीमती गुलशन मन्सुरी , ललिता जाधव, रोहिणी मोरे , राणी शहा यांच्यासह परिसरातील महिला उपस्थित होत्या.

Web Title: Bhujbal receives data for water supply scheme repair budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.