शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

नामपूरला भवानी माता यात्रोत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 00:14 IST

नामपूर : उत्तर महाराष्ट्र तसेच मोसम खोऱ्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणाऱ्या आई भवानी मातेचा यात्रोत्सव कोरोनामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे लेखी आदेशही काढण्यात आले असल्याची माहिती प्रशासक भैयासाहेब सावंत, ग्रामविकास अधिकारी केशवराव इंगळे यांनी दिली.

ठळक मुद्देयाबाबतचे लेखी आदेशही काढण्यात आले

नामपूर : उत्तर महाराष्ट्र तसेच मोसम खोऱ्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणाऱ्या आई भवानी मातेचा यात्रोत्सव कोरोनामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे लेखी आदेशही काढण्यात आले असल्याची माहिती प्रशासक भैयासाहेब सावंत, ग्रामविकास अधिकारी केशवराव इंगळे यांनी दिली.

शहरात मोसम नदीच्या काठावर प्राचीन ग्रामदैवत आई भवानी मातेचे प्रसिद्ध मंदिर आहे. याठिकाणी अनेक वर्षांपासून यात्रोत्सव होतो. या यात्रेसाठी गुजरात, धुळे, नंदुरबार, जळगाव, उत्तर महाराष्ट्रातून लाखो भाविक येतात. यावर्षी माघी पौर्णिमेपासून भवानी मातेची यात्रा भरणार होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, ग्रामपंचायत प्रशासनाने ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे व्यावसायिक, भाविकांनी यात्रा उत्सवासाठी कोणतीही दुकाने, मनोरंजनात्मक पाळणे आदी न लावण्याचे आवाहन केले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिला आहे. यात्रोत्सव रद्द झाल्याने लाखोंची उलाढाल ठप्प होणार आहे.राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढायला सुरुवात झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे यावर्षी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार भवानी माता यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.- केशवराव इंगळे, ग्रामविकास अधिकारी, नामपूर  (२२ नामपूर)

टॅग्स :TempleमंदिरSocialसामाजिक