शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

भालचंद्र नेमाडे यांणा ‘जीवनगौरव’ पुरस्कार

By admin | Updated: April 6, 2015 01:23 IST

भालचंद्र नेमाडे यांणा ‘जीवनगौरव’ पुरस्कार

नाशिक : इंग्रजी शाळांना कडाडून विरोध करून मुलांना मातृभाषेतूनच शिक्षण द्यायला हवे. इंग्रजीचा उदोउदो करणे हा निव्वळ मूर्खपणा असून, इंग्रजीच्या वापरातून आपण कनिष्ठ जातींच्या लोकांवर अत्याचार करीत असतो, असे परखड मत ‘ज्ञानपीठ’ विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने ‘जीवनगौरव’ पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. संबळच्या तालावर कळवण तालुक्यातील भास्कर व सरस्वती गुंजाळ या शेतकरी दाम्पत्याच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या या कार्यक्रमात नेमाडे यांच्यासह सुरेश खानापूरकर, संजय पाटील, विजय हाके, विलास पाटील, स्मिता तांबे, दीप्ती राऊत, सुभाष नंदन, डॉ. दिग्विजय शाह, कृष्णा बच्छाव, अभिमन जाधव, सुनीता पाटील, अविनाश भामरे, प्रतिभा होळकर, कमलाकर देसले यांना ‘गिरणा गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी नेमाडे यांनी भाषा, परंपरेतील आधुनिकता, जातिव्यवस्था आदि विषयांवर मुक्त चिंतन केले. जगात सर्वत्र मुलांना मातृभाषेतून शिकवले जात असताना, भारतात मात्र इंग्रजीचा उदोउदो केला जातो. तीन-तीन लाख फी भरून इंटरनॅशनल स्कूलमध्ये अ‍ॅडमिशन घेतले जाते. असे शिक्षण घेणारे लोक हॉटेलांत झाडलोटीचे काम करतात. इंग्रजीमुळे मोठे सामाजिक दोष निर्माण होत आहेत. पुण्यातील शुद्ध मराठीचा आग्रह धरणे चुकीचे असून, बोलीभाषा याच खऱ्या शुद्ध भाषा आहेत, असेही ते म्हणाले. नोबेल, बुकर पुरस्कार मिळवणारे साहित्य खरे नसून, जात्यावरच्या ओव्या, लोकगीते हेच खरे चिरंजीव साहित्य आहे. गावातले देशी सौंदर्य अनुभवण्याऐवजी आपण मुंबईत मोठेपण शोधतो, हे चुकीचे आहे. खांदेशी मराठी ही जुन्यात जुनी भाषा असून, ज्ञानेश्वरांपूर्वीही मराठी लिहिली जात असल्याचा दावा त्यांनी केला. शेतकऱ्यांचे जीवन अत्यंत विदारक असून, त्यांच्यासाठी चळवळ सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. पुरस्कारार्थींच्या वतीने स्मिता तांबे, कमलाकर देसले यांनी कृतज्ञता व्यक्त केली. प्रतिभा नेमाडे, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार, आनंद अ‍ॅग्रो समूहाचे अध्यक्ष उद्धव अहिरे, वैशाली अहिरे यांच्यासह पुरस्कारार्थी व्यासपीठावर उपस्थित होते. दीपक करंजीकर यांनी नेमाडे यांचा परिचय करून दिला. दत्ता पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. स्वानंद बेदरकर यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)