इंदिरानगर परिसरात भुलाबाईचा उत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:01 IST2017-09-11T01:01:41+5:302017-09-11T01:01:41+5:30

भुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून, भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरूपी शंकराला भुलवायला आलेल्या पार्वतीला भुलाबाई असे म्हणतात. भुलोबा म्हणजे शंकर, तर भुलाबाई म्हणजे पार्वती. अशा या भुलाबाईचा उत्सव इंदिरानगर भागात प्रगती महिला मंडळाच्या वतीने साजरा करण्यात आला.

Bhalabai festival is celebrated in the area of ​​Indiranagar | इंदिरानगर परिसरात भुलाबाईचा उत्सव साजरा

इंदिरानगर परिसरात भुलाबाईचा उत्सव साजरा

भुलाबाईच्या उत्सवात खेळ सादर करताना महिलावर्ग.

इंदिरानगर : भुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून, भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरूपी शंकराला भुलवायला आलेल्या पार्वतीला भुलाबाई असे म्हणतात. भुलोबा म्हणजे शंकर, तर भुलाबाई म्हणजे पार्वती. अशा या भुलाबाईचा उत्सव इंदिरानगर भागात प्रगती महिला मंडळाच्या वतीने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात परिसरातील महिलांनी विविध प्रकारचे खेळ व गाणी सादर केली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली. यावेळी नृत्यांगना व सिनेकलावंत प्रेषिता पंडित, अनिता सोनवणे, राजश्री शौचे, नृत्यांगना कीर्ती भवाळकर, पूर्व प्रभागाच्या सभापती शाहीन मिर्झा, सुजाता करजगीकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी केले होते. कार्यक्र मात संयम महिला मंडळ, कल्याणी भजनी मंडळ, जिगीषा ग्रुप, महालक्ष्मी बचतगट, स्वराली भजन मंडळ, साई महिला मंडळ, यशश्री ग्रुप आदींसह महिलांनी सहभाग घेतला होता.

Web Title: Bhalabai festival is celebrated in the area of ​​Indiranagar