शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

चौथ्या दिवशीही बॅँकेत गर्दी

By admin | Updated: November 14, 2016 00:07 IST

चौथ्या दिवशीही बॅँकेत गर्दी

ओझर टाऊनशिप : रद्द करण्यात आलेल्या ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा बदलणे व खात्यात जमा करण्यासाठी आज चौथ्या दिवशीही नागरिकांनी पोस्ट कार्यालयासह चारही बँके बाहेर व्यवहार सुरू होण्यापूर्वीच रांग लावली होती. आज रविवार सुटी असल्याने तीन दिवसांच्या तुलनेत आज जास्त गर्दी होती. येथील पोस्ट कार्यालयासह स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, आयसीआयसीआय बँक व पंजाब नॅशनल बँकेच्या बाहेर नागरिकांनी मोठ मोठ्या रांगा लावल्या होत्या. आज रविवार सुटीचा दिवस असल्याने गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत आज जास्तच गर्दी झाल्याने प्रत्येकाला अडीच ते तीन तास रांगेत उभे रहावे लागत होते. स्टेट बँकेत पाच काउंटर सुरू होते. पोस्ट कार्यालयात एक, तर पंजाब व आयसीआयसीआय बँकेत प्रत्येकी दोन काउंटर सुरू होते. काही झाले तरी आज बँकेतून नोटा बदलून घ्यावयाच्या किंवा खात्यात जमा करावयाच्या असा चंग बांधूनच अनेकांनी घरातून पाय काढला. चौथ्या दिवशीही प्रचंड गर्दी झाल्यामुळे बॅँक कर्मचाऱ्यांचे हाल झाले होते. मोठ मोठ्या रांगा लागल्याने ज्येष्ठ नागरिकांचे यात खूप हाल झाले. आठवड्याची एक दिवसाची रविवारची सुटीसुद्धा बँकेत नोटा जमा करणे, बदलणे या कामातच गेली असे कामगारांनी सांगितले. बॅँक प्रशासनानेही १००च्या नोटा न देता २००० च्या नवीन नोटा बदलून दिल्या आहेत. यामुळे बॅँकेतून बाहेर आलेल्या नागरिकांना दोन हजारचे सुटे कुठे मिळतील या काळजीनेही अनेकांना ग्रासलेले दिसून आले. (वार्ताहर)