शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसवर रिक्षाचालकाचा रिक्षा पेटविण्याचा प्रयत्न

By admin | Updated: April 2, 2017 22:23 IST

फ्रंट सिट वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकास शहर वाहतूक पोलिसाने कारवाईसाठी थांबविले असता चालकाने डिक्कीतील पेट्रोल काढून रिक्षावर टाकून पेटविण्याचा प्रयत्न केल्याची घटना

नाशिक : फ्रंट सिट वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकास शहर वाहतूक पोलिसाने कारवाईसाठी थांबविले असता चालकाने डिक्कीतील पेट्रोल काढून रिक्षावर टाकून पेटविण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी (दि़१) दुपारच्या सुमारास सीबीएस सिग्नलजवळ घडली़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संबंधित रिक्षाचालकाच्या विरोधात मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे़सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहर वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई ढाकणे हे सीबीएस सिग्नलवर कर्तव्यावर होते़ यावेळी फ्रंट सिट वाहतूक करणारा एमएच १५, इएच ३३६१ वरील रिक्षाचालक रिझवान कादीर शेख (३७, जगतापवाडी, स्वारबाबानगर, सातपूर) यास अडविले़ तेव्हा त्याने माझ्या दोन रिक्षा जमा केल्या आहेत, त्यामुळे मी खूप मानसिक टेन्शनमध्ये आहे, असे म्हणून ढाकणे यांना कारवाई करण्यास मज्जाव केला़ यानंतर ढाकणे यांना मी तुम्हाला दाखवितो असे म्हणत रिक्षामध्ये बसलेल्या प्रवाशांना उतरवून डिक्कीत ठेवलेली पेट्रोलची बाटली काढून रिक्षावर पेट्रोल ओतले़ यानंतर रिक्षा पेटवून देण्यासाठी आगपेटी शोधू लागला़ सीबीएस सिग्नलवर असलेले वाहतूक पोलीस कर्मचारी व रिक्षाचालक यांच्यामध्ये सुरू असलेल्या या वादावादीत अचानक रिक्षाचालकाने घेतलेल्या पावित्र्यामुळे खळबळ निर्माण झाली होती़ तर पोलिसांनी वेळीत शेख यास ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला़ याप्रकरणी ज्वालाग्रही पदार्थाबाबत हयगयीने कृती करून सार्वजिनिक ठिकाणी रस्त्यावर इतरांच्या जीवितास तसेच व्यक्तिगत सुरक्षेस धोका निर्माण होईल, अशी कृती केल्याने सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़