शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅस्ट्रो ओपीडी’ निव्वळ मुर्खपणा : पुरुषोत्तम आवारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 20:18 IST

सरकारी रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात ‘अ‍ॅस्ट्रो ओपीडी’ सुरू करण्याचा मध्य प्रदेशच्या भाजपा सरकारने घेतलेला निर्णय मुर्खपणाचा आहे.

ठळक मुद्देदेशभरात सध्या विज्ञानाच्या वाढत्या गळचेपीमुळे वैज्ञानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बुधवारी (दि.९) देशपातळीवर वैज्ञानिक रस्त्यांवर उतरून निषेध मोर्चा काढत आहेज्योतिषांच्या सल्ल्यानुसार डॉक्टर रुग्णांवर उपचार करणार आहेतवैज्ञानिक दृष्टिकोणावर घाला भाजपा सरकारकडून विज्ञानाची होणारी गळचेपी यावर जोरदार टीका

नाशिक : सरकारी रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात ‘अ‍ॅस्ट्रो ओपीडी’ सुरू करण्याचा मध्य प्रदेशच्या भाजपा सरकारने घेतलेला निर्णय मुर्खपणाचा आहे. या घातक निर्णयामुळे परिवर्तनाची चाके उलटी फिरणार असल्याची टीका अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याचे प्रवक्ते पुरुषोत्तम आवारे यांनी केली.अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संघटन वाढीसाठी नाशिकमध्ये आलेले आवारे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना भाजपा सरकारकडून विज्ञानाची होणारी गळचेपी यावर जोरदार टीका केली. यावेळी आवारे म्हणाले, महाराष्टÑ एकमेव राज्य आहे की या राज्यात जादूटोणाविरोधी कायदा संमत करण्यात आला आहे. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समितीकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. राज्यस्तरावर या कायद्याच्या प्रचार-प्रसारासाठी समितीने धोरणात्मक कार्यक्रम हाती घेतला आहे. मध्य प्रदेश सरकारकडून सरकारी रुग्णालयात ज्योतिषी सल्ला देण्याचा घेण्यात आलेला निर्णय एकप्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोणावर घाला घालणारा आहे. या निर्णयामुळे विज्ञानाची गळचेपी अधिक वाढणार आहे. सरकारी रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण तपासणी विभागात ज्योतिषी रुग्णांच्या हस्तरेषा, जन्मकुंडली बघून रोगाचे निदान करणार आहेत. तसेच जीवनरेषा तपासणार आहेत. ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार डॉक्टर रुग्णांवर उपचार करणार आहेत, असा हा निर्णय मध्य प्रदेशच्या भाजपा सरकारने घेऊन लोकांना दैववादी बनविण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकले आहे; मात्र अखिल भारतीय अंनिसचा या निर्णयाला प्रखर विरोध आहे.कदेशभरात सध्या विज्ञानाच्या वाढत्या गळचेपीमुळे वैज्ञानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या संतापातूनच येत्या बुधवारी (दि.९) देशपातळीवर वैज्ञानिक रस्त्यांवर उतरून निषेध मोर्चा काढत आहे. या मोर्चांनाही समितीचा पाठिंबा असल्याचे आवारे यांनी यावेळी स्पष्ट केले.