नाशिक : जर्मनी येथील महिलेची पर्स चोरणाऱ्या चोरट्याला सरकारवाडा पोलिसांनी अटक केली असून, त्यास न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ आंद्रिया विडेन्ड (२४, रा़ जर्मनी) ही महिला नाशिकमध्ये पर्यटनासाठी आली होती़ १५ आॅगस्ट रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास ठक्कर बझार परिसरातून जात असताना तिडके कॉलनीतील राहुलनगर झोपडपट्टीमध्ये राहणारा संशयित आकाश बाळासाहेब सूर्यवंशी या भामट्याने त्यांची पर्स पळवून नेली़ या पर्समध्ये तीन हजार रुपये रोख, आयडी कार्ड, एटीएम कार्ड, व्हिजा कार्ड आदि प्रकारचे दस्तावेज होते़ सरकारवाडा पोलिसांनी सूर्यवंशीला अटक केली असून, त्याच्याकडून पाचशे रुपयेही जप्त केले आहेत़ (प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}