शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्त्येच्या सूत्रधारांना अटक करा

By admin | Updated: August 21, 2015 00:39 IST

मागणी : अंधश्रद्धा निर्मूलन समितीची निदर्शने

नाशिक : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्त्येला दोन वर्षे पूर्ण होऊनदेखील अद्याप तपासाला गती मिळालेली नाही. हत्त्येचा कट रचणारे सूत्रधार अद्यापही मोकाट असून, त्यांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.पुरोगामी विचारधारा मांडणारे व रूढ करणारे दाभोलकर यांची हत्त्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी लांच्छनास्पद बाब आहे. राज्य सरकारची पोलीस यंत्रणा या हत्त्येच्या तपासात अयशस्वी ठरल्याने न्यायालयाने पुढील तपासाची सर्वस्वी जबाबदारी केंद्रीय अन्वेषण गुन्हे विभागावर सोपविली; मात्र तरीदेखील प्रगती झाल्याचे अद्याप जाणवत नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. याबाबत मुख्यमंत्री, पंतप्रधान, गुन्हे विभागाचे प्रमुखांशी वारंवार पत्रव्यवहार केला; मात्र त्याचा कुठलाही परिणाम झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे संपूर्ण राज्यात याबाबत अस्वस्थता व उद्वेगाची भावना कायम असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिकपणे याकडे लक्ष देऊन तातडीने या राज्यातील पुरोगामी विचाराच्या जनतेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर महेंद्र दातरंगे, सुधीर धुमाळ, कृष्णा चांदगुडे, दिलीप सुकेणकर, अण्णा हिंगमिरे, राजेंद्र फेगडे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)