शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यविधी साहित्याच्या ठेक्याचा वाद स्थायीत

By admin | Updated: September 23, 2016 01:17 IST

पडसाद : आरोग्य विभागाच्या कारभारावर टीका

नाशिक : मोफत अंत्यसंस्कार योजनेंतर्गत अंत्यविधीचे साहित्य पुरवणाऱ्या ठेक्याबाबत कार्यादेश एकाला आणि बिले अदा करायची दुसऱ्याला, असा पेचात टाकणारा प्रस्ताव स्थायी समितीच्या विषय पटलावर आला. यावेळी सदस्यांनी आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारावर टीका करत चौकशीची मागणी केली. दरम्यान, दोन ठेकेदारांच्या वादात अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता संबंधित ठेकेदारांना सोबत बोलावून तोडगा काढण्याची सूचना स्थायी समितीचे सभापती सलीम शेख यांनी प्रशासनाला केली. नाशिक पूर्व विभागातील अमरधाममध्ये अत्ंयविधीच्या साहित्याचा ठेका घेण्यावरून मालपाणी विरुद्ध हिरवे असा दोन ठेकेदारांमधील वाद सुरू आहे. सदर वाद न्यायप्रवीष्ट आहे. दरम्यान, मोफत अंत्यसंस्कार योजनेअंतर्गत ठेकेदार रामचंद्र हिरवे यांच्याकडून काम करून घेण्यात आल्याने त्यांना ३७ लाख ५२ हजार रुपयांचे बिल अदा करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीवर ठेवण्यात आला होता. यावेळी रंजना पवार यांनी सदर ठेक्याबाबत आरोग्य विभागाकडून चुकीचे कामकाज होत असल्याचा आरोप करत त्याबाबत सखोल चौकशीची मागणी केली. पवार यांनी आरोग्याधिकारी डॉ. डेकाटे यांना सदर ठेक्याबाबत काही प्रश्नही उपस्थित केले. निविदाप्रक्रियेनुसार सर्वांत न्यूनतम निविदाधारक मालपाणी असताना हिरवे यांना काम कसे देण्यात आले आणि मालपाणी यांना दोनदा कार्यादेश देऊनही त्यांना काम का दिले गेले नाही. या प्रश्नाला उत्तर देताना डेकाटे यांनी मालपाणी यांच्याकडे शॉप अ‍ॅक्ट लायसेन नसल्याचे स्पष्ट केले. परंतु प्रकाश लोंढे यांनी डेकाटे यांना धारेवर धरत अटी-शर्तीत मालपाणी बसत नव्हते तर त्यांना निविदा प्रक्रियेत सहभागी का करून घेतले, असा सवाल केला. त्यावर डेकाटे निरुत्तर झाले. दिनकर पाटील यांनी सातपूर, आनंदवली, गंगापूर परिसरात अंत्यविधीचे साहित्यच उपलब्ध होत नसल्याची तक्रार केली. आरोग्य विभागाच्या अनागोंदी कारभारावरही त्यांनी टीकास्त्र सोडले. (प्रतिनिधी)